उपजिल्हा रुग्णालयात कर्करोग तपासणी शिबिर
उपजिल्हा रुग्णालयातील सुविधा साठी प्रयत्न करु. नारायण आबा पाटील आमदार करमाळा. करमाळा;- दि,(10/4/25 ) उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे कर्करोग जनजागृती मोहीम शिबिराचे उदघाटन करमाळा तालुक्याचे आमदार नारायण आबा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी आदिनाथ कारखान्याचे संचालक डॉक्टर अमोल घाडगे, उपजिल्हा रुग्णालयाचे रुग्ण कल्याण समितीचे सदस्य फारूक जमादार, सोलापूर जिल्हा परिषद चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले , उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गजानन गुंजकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काटकर, करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे ,स्त्री रोग तज्ञ डॉक्टर स्मिता बंडगर, जयंत दळवी,विशाल परदेशी, आदींच्या उपस्थित संपन्न झाला
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गजानन गुंजकर यांनी केले
यावेळी डॉ, अमोल घाडगे, डॉ,कविता कांबळे आदींनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी आमदार पाटील म्हणाले की, कर्करोग रुग्ण संख्या वाढण्याचे कारण आपली बदलती जीवनशैली व खानपानामध्ये बदल झाल्यामुळे होत असल्याचे दिसून येत आहे कर्करोगाला घाबरून न जाता त्याचे लवकरात लवकर निदान करून उपचार करण्याबाबत आवाहन केले तसेच उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथील सोयी सुविधा बाबत शासना कडे पाठपुरावा करु असे आश्वासन यावेळी दिले तसेच यावेळी शिबिराच्या अनुषंगाने सर्व अधिकारी व कर्मचारी चे कौतुक केले
यावेळी. झालेल्या कर्करोग शिबिरात २५६ स्री व पुरुष यांची तपासणी करण्यात आली यासाठी अत्याधुनिक सर्व सोयी सुसज्ज कॅन्सर व्हॅन उपजिल्हा रुग्णालय येथे उपलब्ध करण्यात आली होती या शिबिरामध्ये स्री रोग तज्ञ डॉ,बंडगर यांनी कर्करोग रुग्णाची तपासणी करून मार्गदर्शन केले तसेच दंतरोग चिकित्सक डॉ, गोरक्षनाथ शिंदे यांनी ओरल कॅन्सर संदर्भात तपासणी व मार्गदर्शन केले
या कार्यक्रमासाठी
उपजिल्हा रुग्णालय मधील सर्व डॉक्टर व सर्व कर्मचारी तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय बालस्वास्थ अधिकारी व कर्मचारी,आरोग्य सेविका, सेवक,आशा गटप्रवर्तक,आशा स्वयंसेविका,
यांनी परिश्रम घेतले
