
करमाळा प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले हे पराक्रमी, युद्धप्रसंगी दाखवायची बुद्धिमत्ता असलेले व उत्तम प्रशासक होते. भोसले घराण्यांच्या उत्कर्षाचा पाया मालोजीराजे भोसले यांनी घातला. आपल्या कामगिरीने मालोजींनी बुऱ्हाणपूरच्या निजामाचा विश्वास संपादन केला. त्यामुळे सरहद्दीवरील इंदापूरच्या बाजूच्या शत्रूचा बदोबस्त करण्याची

कामगिरी निजामाने मालोजींवर सोपवली. त्यावेळी मालोजीराजे भोसले यांनी भीमा नदी काठच्या कुर्मग्राम (कुगाव) या ठिकाणी सैन्याना रसद मिळण्यासाठी मदत व्हावी म्हणून किल्ला बांधला. हा किल्ला पुढे इनामात १८९३ साली यशवंत मेघश्याम इनामदार यांच्याकडे देण्यात आला. आता या किल्याला इनामदार वाडा असेही म्हटले जाते या ठिकाणी नागराज मंजुळे यांनी सैराट चित्रपटातील काही प्रसंग चित्रीत केले होते. त्यामुळे हा किल्ला पर्यटकांसमोर आला. सध्या हा किल्ला

उजनी बॅकवॉटर परिसरातील पाणी उथळ झाल्याने हा किल्ला उघडा पडायला लागला आहे. फक्त उन्हाळ्यातच हा किल्ला उघडा पडत असल्यामुळे मावळे, हनुमान भक्त, पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येतात.
तेजस्विनी दयानंद कोकरे मा. सरपंच ग्रामपंचायत कुगाव ता. करमाळा