करमाळा प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या आरोग्य सेवेत मदत होत असून यात्रे मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषधे वाटपाचा कौतुकास्पद व अनुकरणीय कार्यक्रम राहुल कानगुडे यांच्या माध्यमातून होत आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी देवळाली येथे केले. देवळाली गावच्या ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज यात्रेमध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना युवा मा. तालुकाध्यक्ष राहुल कानगुडे यांच्या वतीने सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात ७८० रुग्णांची तपासणी करून सुमारे तीन लाख रुपयांच्या औषधे रुग्णांना मोफत वाटण्यात आली रुग्णांची तपासणी करण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच उपजिल्हा रुग्णालय करमाळा व मातोश्री गंगुबाई शिंदे चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्टच्या डॉक्टरांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मंगेश चिवटे यांची उपस्थिती होती.

या शिबिराचे उद्घाटन संभाजी ढेरे व मंगेशजी चिवटे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, सरपंच पोपट बोराडे, औदुंबर गणेशकर, राजेंद्र घळके, सुनील आवटे, सुधीर आवटे, गोरख पवार, नागेश दामोदरे, नितीन दामोदरे, नागेश चेंडेगे, प्रफुल्ल दामोदरे, किसन चांदणे, अशोक गायकवाड, नितीन कानगुडे, संतोष कानगुडे, तानाजी गुटाळ इ. उपस्थित होते.

…………………….

मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे चारिटेबल हॉस्पिटल च्या माध्यमातून आगामी काळात कॅश लेस हॉस्पिटल चालू करण्याचा मनोदय असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या वतीने करमाळातील रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न करणार : मंगेश चिवटे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *