करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील उजनीची पाणी पातळी खालावली असली तरी कोळगाव धरणातील पाणी पातळी बऱ्यापैकी असताना आमदार नारायण आबा पाटील यांनी कार्यतप्तरता दाखवून पुर्व भागातील गौंडरे, आवाटी, नेरले, सालसे, कोळगाव आदि गावातील संभाव्य पाणी टंचाई, गुरासाठीची चारा टंचाई दुर करण्यासाठी वेळीच पाऊल‌ उचलून उन्हाळी आवर्तन देण्याच्या सुचना संबंधित विभागास केली. यामुळे शनिवार दि.३ मे २०२५ रोजी करमाळा विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते व जेऊर गावचे लोकनियुक्त सरपंच पै.पृथ्वीराज भैय्या पाटील यांच्या हस्ते सिना-कोळगाव उपसा सिंचन योजनेचे दुसरे आवर्तन चालू करण्यात आले.

त्यावेळी आ.स.सा.का.संचालक आबासाहेब अंबारे,सिना-कोळगाव आभियंता कांबळे,  बप्पा आतकरे, महादेव धोंडे, महेश पाटील, सतीश रुपणवर, जयराज कदम, सोमनाथ येवाळे, नागनाथ धोंडे, तात्या तांबे, गणेश पाटील तसेच  गौंडरे, आवाटी, नेरले, कोळगाव, सालसे भागातील शेतकरी ऐन उन्हाळ्यात पाणी सुटल्याने समाधानी झाला आहे. सीना कोळगाव उपसा सिंचन योजनेतुन या अगोदरही एक आवर्तन देण्यात आले. ही योजना पुर्ण क्षमतेने चालण्यासाठी पंपहाऊस तसेच मुख्य कालवा दुरुस्तीसाठीही आमदार नारायण आबा पाटील यांनी मागणी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *