करमाळा प्रतिनिधी

फसवणूक झाल्याची तक्रार अशोक शेळके व वैशाली शेळके यांनी सोलापूर पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे संबंधितांना अटक करावी अन्यथा महाराष्ट्र दिना वेळी आत्मदहन करणार असल्याचे तक्रारीत शेळके पती पत्नी यांनी म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, उपरोक्त विषयी कारणे तक्रारी अर्ज करतो की, मी गाव मौजे पुनवर, ता. करमाळा येथील रहिवाशी असून शेती करून मी माझे कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो. असे असताना माझी पत्नी सौ. वैशाली हिच्या नावे मौजे जवळा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर (अहमदनगर) येथील जमीन गट नं. १२९ पैकी ०१ हे. ६० आर जमीन दिनांक ०४/०९ / २०२२ रोजी मुलांच्या शिक्षणासाठी अनिल कांतीलाल कादगे यांना खरेदी दिलेली होती.

मी पुनवर आणि जवळा येथील शेती करत होतो. या दरम्यान जवळा येथील जिल्हा परिषद मध्ये कार्यरत असणारे शिक्षक अतुल शिवाजी कोल्हे, रा. जवळा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर यांच्याशी माझी दोस्ती संबंध तयार झाले. जवळा येथील माझे पत्नीच्या नावे असलेली शेत विकल्यानंतर मी पुनवर येथे राहत असताना जुन्या ओळखीचा फायदा घेऊन जवळा येथील शिक्षक अतुल शिवाजी कोल्हे, व त्यांची पत्नी नाव माहित नाही, वडील शिवाजी कोल्हे व आई यशोदा शिवाजी कोल्हे यांनी माझे घरी येऊन आमचा पाहुणा प्रशांत रामकृष्ण होन, रा. कोल्हार, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर (अहमदनगर) यांची पुणे येथे फार मोठी कंपनी असून सदर कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विनंती केली.

सदर कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवलेल्या रकमेवर प्रतिमहा व्याज किंवा नफा तुम्हांस आम्ही घरपोहच बैंक खात्यावर देवू अशी माहिती सांगितली. मार्च २०२३ महिन्यामध्ये माझे ओळखीचा अतुल शिवाजी कोल्हे हे माझेकडे ब्रिक्स सोल्युशन कंपनी माझे पाहुण्यांची प्रशांत राधाकृष्ण होन, रा. कोल्हार, ता. राहता, जि. अहमदनगर यांची असून ती नफ्यामध्ये चालु आहे. कंपनी वाढवायची असल्याने आपण गुंतवणुक केली तर कंपनीतून होणान्या नफ्यातून तुम्हाला आर्थिक लाभ जास्त प्रमाणामध्ये मिळेल असे सांगितले होते. त्यानंतर मी त्यांना नफाबाबत सविस्तर विचारणा केली असता त्यांनी मला १,००,०००/- रू. ला. ५०००/- रूप प्रती महिना तुम्हाला नफाचा लाभ मिळेल असे सांगितले होते. त्यानंतर अतुल कोल्हे व त्यांची पत्नी (नाव माहित नाही) असे काही दिवसांनी आमचे घरी आले होते. त्यावेळी अतुल कोल्हे यांचे पत्नीने मला स्किम बाबत माहिती सांगितली होती, मला ती स्कीम पटली होती म्हणून मी पैसे गुंतवण्यास तयार झालो होतो. मी माझेकडे घरी असलेली १,००,०००/- रू. रोख रक्कम स्वरूपामध्ये अतुल कोल्हे यांना गुंतवणुकीसाठी दिली होती. त्यानंतर मला अतुल कोल्हे यांनी मला ब्रिक्स सोल्युशन कंपनीच्या अकाउंट नं. ०४१२६३४००००२६६७८ हा खाते नंबर पाठविला होता. काही दिवसानंतर अतुल कोल्हे, त्यांची पत्नी, त्यांचे वडील शिवाजी, आई यशोदा असे आमचे घरी आले होते त्यांनी मला त्यांचे पाहुणे प्रशांत होन यांचे कंपनीबाबत माहिती सांगून त्या कंपनीमध्ये मला पैसे गुंतवणूक केल्यास तुम्हाला घरबसल्या तुमच्या अकाऊंटवर नफा जमा होत राहील असे सांगून पैसे गुंतवण्यास विनंती केली होती. त्यानंतर काही दिवसानंतर अतुल कोल्हे यांचे पाहुणे प्रशांत होन यांचे वडील राधाकृष्ण व आई मुक्ताबाई, त्यांची पत्नी नाव माहिती नाही असे आमचे घरी आले होते. मला त्यांची स्किम आवडल्याने व चांगला आर्थिक फायदा होणार असल्याने मी कंपनीमध्ये पैसे गुंतवण्यास तयार झालो.

– त्यानंतर दि. २६/०५/२०२३ रोजी मी अतुल कोल्हे यांनी दिलेल्या खाते नंबरवर ११ लाख रूपये माझे खातेवरून आर. टी. जी. एस. द्वारे पाठविले होते. त्यानंतर मी टप्याटप्याने दि. ३१/०५/२०२३ रोजी ६ लाख रूपये, दि. ०७/०९/२०२३ रोजी ७ लाख रूपये, दि. ०७ / १० / २०२३ रोजी १ लाख रूपये, दि. ०६/११/२०२३ रोजी १ लाख रूपये, दि. ०६१२ / २०२३ रोजी १ लाख ५० हजार रूप, दि. ०६/०१/२०२४ रोजी १ लाख ५० हजार रूपये, अशी एकुण २९ लाख रूपये रक्कम माझे खातेवरून मी अतुल कोल्हे यांनी दिलेल्या खाते नंबरला आरटीजीएस द्वारे पाठविले होते, व मी अॅडव्हान्समध्ये दिलेले १ लाख रूपये असे एकुण ३० लाख रूपये मी ब्रिक्स कंपनीमध्ये गुंतवणुक केलेली होती. तसेच दि. ०३/०९/२०२३ रोजी अतुल कोल्हे यांचे आई वडिल व प्रशांत होन यांचे आई वडील आमचे घरी आल्यानंतर मी त्यांना घरातून सोने तारण ठेऊन आलेली रक्कम रू. १० लाख रू. ही रोख स्वरूपात त्यांना गुंतवणुकीसाठी दिली होती. अशी सर्व रक्कम मिळून मी त्यांना ४० लाख रूपये गुंतवणुकीसाठी दिलेले होते.

सदर गुंतवणिकीचे नफ्याच्या स्वरूपामध्ये मला दि. ०४/०७/२०२३ रोजी ९०,०००/- – दि ०४/०८/२०२३ रोजी ९०,०००/-, दि. ०४/०९/२०२३ रोजी ९०,०००/-, दि. ०६/१० / २०२३ रोजी १ लाख रूपये, दि. ०५/११/२०२३ रोजी १ लाख रूपये, दि. ०५/१२/२०२३ रोजी १ लाख रूपये, दि. ०४ / ०१ / २०२४ रोजी १ लाख रूपये, दि. ११/०३/२०२४ रोजी २ लाख रूपये व दि. ०६/०५/२०२४ रोजी १ लाख रूपये एवढी रक्कम ही माझे खात्यावर कंपनीच्या अकाउंटवरून जमा झालेली होती.

त्यानंतर दि. ०६ ऑक्टोंबर २०२३ रोजी २५,०००/-, दि. ०४ नोव्हेंबर २०२३ रोजी ३०,०००/-, दि. ०५ डिसेंबर २०२३ रोजी ३५,०००/-, अशी एकुण ९०,०००/- रू. रक्कम ही प्रशांत होन यांचे कंपनीच्या खात्यावरून माझे पत्नी वैशाली हिच्या खात्यावर जमा झालेली होती. त्यानंतर दि. २९ मार्च २०२४ रोजी २०,०००/-, दि. ०२ एप्रिल २०२४ रोजी, २४,५००/- – दि. २७ जून २०२४ रोजी १,०००/- रूपये अशी एकुण ४५,५००/- रक्कम मी अतुल कोल्हे यांचे अकाऊंटवरून माझे पत्नी वैशाली हिचे अकाऊंटवर जमा झालेली होती. अशी एकुण १,३५,५००/- रक्कम ही माझे पत्नीच्या अकाऊंटवर जमा झाली होती. अशी एकुण ११ लाख ५,५०० रू. रक्कम ही मला नफ्याच्या स्वरूपामध्ये प्राप्त झालेली होती.

मला माझे मुलांच्या शिक्षणाकरिता पेशाची गरज असल्याने मी माहे जानेवारी २०२४   पासून अतुल कोल्हे व प्रशांत होन यांना मी दिलेल्या पैशाची मागणी करण्यास सुरूवात केली होती. परंतु ते मला नफ्याच्या स्वरूपात येणारी रक्कम देत होते. परंतु मी त्यांना मी दिलेली पुर्ण मुद्दल ४० लाख रूपये व त्यावर येणारी नफा रक्कम मागणी करत होतो. तेंव्हा ते मला या महिन्यामध्ये देतो पुढच्या महिन्यामध्ये देतो असे म्हणून टाळाटाळ करत होते. माहे जून व जुलै महिन्यामध्ये मला कंपनीकडून नफ्याच्या स्वरूपामध्ये येणारी रक्कम सुधा देणे बंद केले होते. मी त्यांना वारंवार फोन करण्यास सुरूवात केली असता अतुल कोल्हे यांनी माझा फोन घेणे टाळत होते म्हणून मी स्वतः जावून त्यांची भेट घेतली असता त्यांनी मला उडवा उडवीची उत्तरे देवून प्रशांत होन यांची भेट घेण्यास सांगितले होते. मी प्रशांत होन यांची भेट घेण्याकरिता त्यांचे मोशी पुणे येथे असलेल्या कार्यालय येथे मी व अतुल कोल्हे असे दोघे गेलो असता तेथील कार्यालय हे बंद झालेले होते. तसेच प्रशांत होन हा तेथे मिळून आला नाही. सदर ठिकाणी चौकशी केली असता तेथील लोकांकडून मला समजले की, त्याचे कार्यालय हे कायमचे बंद झालेले आहे. त्यानंतर मी प्रशांत होन यांचे घरी कोल्हार, ता. राहुरी येथे गेलो होतो. तेथे प्रशांत होन यांचे वडील राधाकृष्ण यांनी मला तुम्ही आम्हाला पैसे कशाला मागता असे म्हणून मला शिवीगाळी दमदाटी करून तेथून हाकलून लावले होते.

म्हणून माझी खात्री झाली की, अतुल कोल्हे व प्रशांत होन यांनी मला ब्रिक्स कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करून आर्थिक नफा मिळवून देण्याचे अश्वासन देवून माझे कडून ४० लाख रूपये घेऊन ते परत न करता उडवा उडवीची उत्तरे देवून माझी आर्थिक फसवणुक केलेली आहे. म्हमून मी करमाळा पोलीस ठाणे येथे येऊन माझी फसवणुक झालेबाबत तक्रारी अर्ज दिला आहे. मी पोलीस ठाणेस तक्रारी अर्ज दिल्याने अतुल कोल्हे व प्रशांत होन यांना माहिती पडल्याने प्रशांत होन यांनी माझे नावे ब्रिक्स कंपनीचा ३० लाख रु. रक्कमेचा चेक अतुल कोल्हे यांचे मार्फत मला दिला होता. दि. ०५/१० / २०२४ रोजी मी सदरचा चेक घेवून बँकेमध्ये गेलो होतो व सदरची रक्कम ही माझे खात्यावर जमा करून आलो होतो परंतु दि. ०७ / १० / २०२४ रोजी सदर बँकेचा मेसेज आल्यानंतर मला समजले की, सदरचा चेक बाऊन्स  झालेला आहे. त्यानंतर मी बँकेमध्ये जाऊन खात्री केली असता मला समजले की, सदर चेकवरील प्रशांत होन यांची सही खोटी आहे, त्यामुळे सदरची रक्कम ही माझे खात्यावर जमा झालेली नाही. त्यानंतर मी पुन्हा प्रशांत होन यांचे मावस भावाच्या मार्फतीने मला दोन लाख रू. चा ब्रिक्स कंपनीचा व ३ लाख रू. चा अॅक्सीस बँकेचा चेक दिला होता, म्हणून मी अॅक्सीस बँकेमध्ये जाऊन खात्री केली असता सदर चेकवरील सही देखील खोटी असल्याची माहिती मिळाली आहे. अशा प्रकारे अतुल शिवाजी कोल्हे व प्रशांत राधाकृष्ण होन यांनी माझी फसवणुक केलेली आहे.

अशी वस्तुस्थिती असताना मी ऑगस्ट २०२४ पुर्वी पाच ते सहा वेळा उपरोक्त आरोपी विरूध्द तक्रार देणेसाठी करमाळा पोलीस स्टेशनला आलो असता तत्सम पोलीस अधिकारी याने माझे काहीएक ऐकुण न घेता आज या उद्या या अशी उडवा उडवीची उत्तरे देऊन उपरोक्त आरोपीविरूध्द तक्रार नोंदवून घेणेस टाळाटाळ केली. व सदर गुन्हा दाखल होण्यापुर्वी त्यावेळी अतुल शिवाजी कोल्हे, यांचे मेव्हणे शिंदे गुरुजी रा. रायगांव ता. करमळा, जि. सोलापूर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शिंदे गुरुजी हे एका मित्राबरोबर आले व माझे समोर पोलीस निरीक्षक करमाळा पोलीस स्टेशन घुगे यांना म्हणाले की, तुम्ही गुन्हा दाखल करू नका, काय असेल ते तुमचे मिटवू, असे म्हणाले, त्यामुळे पोलीस निरीक्षक घुगे यांनी माझी तक्रार ऐकुण गुन्हा दाखल करून घेत नव्हते. त्यानंतर मी दिनांक २९/०८/२०२४ रोजी मी उपरोक्त आरोपी यांनी माझी आर्थिक लाभाचे आमीष दाखवून फसवणूक केलेबाबत करमाळा पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज दिला, परंतु त्यानंतरही सदरच्या तक्रारी अर्जावर पोलीस अधिकारी यांनी काहीएक चौकशी, कारवाई केली नाही. याउलट मी वेळोवेळी भेटलो असता मला सदर तक्रारी अर्जाबाबत उडवा उडवीची उत्तरे देऊन वेळकाढूपणा करत होते. त्यानंतर सदरच्या अर्जाची प्रत मी उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा यांचेकडे दि. ०७/०९/२०२४ रोजी दिली व त्यानंतरही करमाळा पोलीस स्टेशन मार्फत कोणतीही चौकशी, कार्यवाही उपरोक्त आरोपी इसमांवर झालेली नव्हती व नाही. असे असताना दिनांक २० /१० /२०२४ रोजी अतुल शिवाजी कोल्हे, ज्ञानेश्वर बबन गवसने, विश्वजित रविंद्र हजारे यांनी मी पोलीस स्टेशन येथे देत असलेल्या तक्रारी अर्जाबाबत विचारणा करून आमचे विरूध्द तक्रार का देतो आहेस म्हणून मला लाथाबुक्याने मारहाण केली, त्याबाबत मी करमाळा पोलीस स्टेशन येथे एन. सी. आर. नं. १८७० / २०२४ दिनांक २०/१०/२०२४ रोजी नोंदविली व सदर तक्रारीचा तपास करण्याचे काम पोलीस हवालदार शेख व पोलीस कॉन्स्टेबल घोरपडे यांचेकडे दिला होता, त्यावेळी मी सदर तक्रार / एन. सी. आर. १८७० चे चौकशीबाबत वेळोवेळी शेख, घोरपडे यांची आवरजून भेट घेतली परंतु दोघांनीही आजतागायत सदर आरोपींना बोलवून त्यांचेवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही, याउलट मलाच आम्हाला दुसरे काय काम नाहीत का? तु काय आम्हाला विचारून पैसे दिले काय? आमच्या मागे बरीच कामे आहेत, तपास कसा करायचा आहे, ते आमचे आम्ही ठरवू, अशी भाषा वापरली. व त्यानंतर पुन्हा पुर्वी दिलेल्या तक्रारी अर्जावर करमाळा पोलीस स्टेशनमार्फत कोणतीही कार्यवाही होत नाही, त्यामुळे मी दि. २१/१०/२०२४ रोजी पोलीस अधिक्षक सोलापूर येथे तक्रारी अर्ज उपरोक्त इसमांचे विरूध्द दाखल केला. त्यानंतर पोलीस अधिक्षक सोलापूर यांचेकडे दिनांक २१ / १० / २०२४ च्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने वेळोवेळी सोलापूर, करमाळा पोलीस स्टेशन येथे पाठपुरावा केली. व मी व माझी पत्नी आरोपी प्रशांत राधाकृष्ण होन यांचे घरी जाऊन घरासमोर बसून राहीलो व फसवणूक केलेल्या पैशाची मागणी केली, त्यावेळी प्रशांत होन चे वडील राधाकृष्ण होन हे कोल्हार पोलीस स्टेशन ला जाऊन पोलीसांना घेऊन आले, त्या पोलीस अधिकारी यांनी माझा व माझे पत्नीचा व्हीडीओ रेकॉर्डींग करून घेतला व करमाळा पोलीस स्टेशनला फोन केला. त्यानंतर मग करमाळा पोलीस स्टेशन येथे दिनांक २२/०१/२०२५ रोजी आरोपी अतुल शिवाजी कोल्हे व प्रशांत राधाकृष्ण होन यांचे विरूध्द गु. र. नं. ४९/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर सदर गुन्ह्याच्या चौकशीकामी मी करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दळवी, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, यांना भेटलो, परंतु त्यांनीही सदर आरोपींवर कारवाई करणेबाबत उडवा उडवीची उत्तरे दिली व आजतागायत सदर आरोपींना अटक केली नाही.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने मी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दळवी साहेब यांचेकडे वेळोवेळी विचारणा केली असता, असे अनेक गुन्हे पंधरा पंधरा वर्षापासून प्रलंबित आहेत, आम्हाला बरीच कामे आहेत, तपास कसा करायचा, कधी करायचा ते आमचं आम्ही ठरवू आम्ही सांगितले होते काय तुम्हाला पैसे द्यायला असे म्हणून मलाच धमकी दिली. याउलट वारंवार पोलीस स्टेशनला येऊन मला त्रास देऊ नका, फोन करू नका, असे म्हणून मला दम दिला. सदर घटनेपासून गुन्हा दाखल होईपावेतो करमाळा पोलीस स्टेशन येथे मला खुप अशी हिन वागणूक देऊन मला मानसिक, आर्थिक त्रास झालेला असून त्यामुळे मी खचून गेलेलो आहे. केवळ पोलीस अधिक्षक सोलापूर यांचेकडे केलेल्या तक्रारी अर्जा व्यतीरिक्त इतर कोणत्याही पोलीस स्टेशनला मला कोणताही न्याय मिळाला नाही.

वरील सर्व आरोपी, करमाळा पोलीस स्टेशनचे तत्सम अधिकारी पोलीस हवालदार शेख व पोलीस कॉन्स्टेबल घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक दळवी, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे त्रासाला कंटाळून व सदर आरोपींना अटक होत नाही, या कारणास्तव मी अशोक बाबु शेळके व माझी पत्नी वैशाली अशोक शेळके आम्ही दोघेही दिनांक ०१/०५/२०२५ रोजी करमाळा पोलीस स्टेशनच्या आवारात आत्मदहन करणार आहे.

तरी वरील सर्व घटनेचा सहानुभुतीपुर्वक विचार होवून वरील गुन्ह्यातील सर्व आरोपींना दि. ०१/०५/२०२५ रोजीपर्यंत अटक करण्यात यावी, ही विनंती. तरी माझ्या अर्जाचा सहानुभुतीपुर्वक विचार करून सदर गुन्ह्यातील आरोपी अतुल शिवाजी कोल्हे व प्रशांत राधाकृष्ण होन यांना करमाळा पोलीस स्टेशन मार्फत त्वरीत अटक करणेबाबत त्वरित आदेश पारित करणेत यावे, तसे न झालेस मी व माझी पत्नी हे दिनांक ०१/०५/२०२५ रोजी करमाळा पोलीस स्टेशनच्या आवारात आत्मदहन करणार आहे. ही विनंती, हा तक्रारी अर्ज असे.

माहितीस्तव प्रत पोलीस निरीक्षक करमाळा पोलीस स्टेशन, तहसिलदार करमाळा, उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा विभाग, जिल्हाधिकारी सोलापूर, विभागीय पोलीस आयुक्त कोल्हापूर, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्यात आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *