
करमाळा प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा शेटफळ येथे ग्रामस्थांच्या वतीने तीव्र निषेध करून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरापराधांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम येथे २१ एप्रिल रोजी पर्यटनासाठी गेलेल्या २७ निशस्त्र व निरापराध लोकांना अतिरेकी हल्ल्यामध्ये आपले प्राण गमवावे लागले. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ला केलेल्या या हल्लेखोरांवर व त्यांना सहकार्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी देशभरातून केली जात आहे. शेटफळ तालुका करमाळा येथील ग्रामस्थांच्या वतीने आव्हान केल्यानंतर या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शिवस्मारक येथे एकत्र येऊन या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी गणेश मोरे, सत्यवान लबडे, अमीत घोगरे, गजेंद्र पोळ यांनी आपले

विचार व्यक्त करून या हल्ल्याची निंदा करत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली. देशाच्या एकात्मतेवर झालेल्या या हल्ल्याच्या वेळी कोणतेही राजकारण न करता सर्वांनी एकत्रित येऊन शासनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज त्यावेळी बोलताना अनेकांनी व्यक्त केली. यावेळी सचिन पोळ, विशाल पोळ, शंकर पोळ, रोहित लबडे, विठ्ठल रोंगे, ज्ञानेश्वर पोळ, लिलाधर पोळ, बाबुराव पोळ, भाऊसाहेब लबडे, लहू पोळ, प्रताप पोळ, सोनू रोंगे, अजय पोळ, महादेव पोळ,सागर पोळ, बाळू लगड, चेतन पोळ, रोहित घोगरे, उमेश घोगरे, संदेश पोळ, ॠषिकेश पोळ व गावातील विविध संघटनांचे प्रतिनिधी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.