
करमाळा प्रतिनिधी
पाकिस्तानच्या घरात घुसून मारा असा हल्ला युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे यांनी चढवला आहे. पाकिस्तानचा जाहीर निषेध करण्यासाठी युवा सेना संपर्क कार्यालय करमाळा येथे शिवसैनिक जमा झाले होते. यावेळी युवा सेना जिल्हा समन्वय चांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला होता. पुढे बोलताना चांदगुडे म्हणाले की,

जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या निष्पाप हिंदूंना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही वाहत आहोत. जम्मू काश्मीर मधील अडकलेल्या नागरिकांना स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणण्यासाठी गेले, नागरिकांना हवे ते सहकार्य केले आहे. भविष्यात दहशतवादी घटना घडु नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

पाकिस्तानच्या घरात घुसून आतंकवादी कारवाया करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे असे मत जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे यांनी व्यक्त केले. यावेळी युवासेना पदाधिकारी श्रीकांत गोसावी, विशाल गायकवाड, श्रीकृष्ण शिंदे, जोतिराम काळे, अनिकेत यादव, गणेश पवार, मनोज रोकडे, सूभाष पाटील, मा. सरपंच योगेश सोरटे, संतोष लाड, संतोष सोरटे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.