
करमाळा प्रतिनिधी
वीट ता. करमाळा येथे महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त मिरवणुकी चे उद्घाटन पोलीस सोनवणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

गुरु शिष्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गुरु शिष्य जयंतीच्या निमित्त प्रथमच अखिल भारतीय समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकी दरम्यान उत्तम असा प्रतिसाद सर्वसामान्य जनता व नवयुवक यांच्याकडून पाहावयास मिळाला गेल्या अनेक वर्षापासून ज्योतिराव फुले यांची जयंती ही फक्त प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात येत होती परंतु यावर्षी प्रथमच सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गुरु शिष्य जयंतीचा योगही कार्यकर्त्यांनी साधला. या मिरवणुकी दरम्यान भव्य अशी आरास जयंतीच्या निमित्ताने करण्यात आली होती. ही आरास महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर मिरवणूक रथास करण्यात आली हो.ती या मिरवणुकीची वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्ण मिरवणूक गुलाल विरहित होती. यावेळी महात्मा फुलेंनी दिलेल्या संदेशाचे पालन करून कार्यकर्त्यांनी फुलां ची मुक्त उधळण संपूर्ण मिरवणूक दरम्यान केली. याकरिता लागणारी 125 किलो फुले खरेदी करण्यात आली होती. फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली होती. करमाळा पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे व कोळेकर यांनी मिरवणुकी दरम्यान बंदोबस्त चौक पार पाडला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय भुजबळ, भाऊसाहेब जाधव, संतोष जाधव, संपत म्हेत्रै, डॉक्टर भुजबळ, रेवन्नाथ जाधव, नवनाथ जाधव, सुहास जाधव, बलभीम जाधव, महादेव भुजबळ, शुभम जाधव, राजेंद्र भोंग अशा अनेक ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले.
संपूर्ण मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे जयंती उत्सव समितीच्या वतीने जगन्नाथ जाधव यांनी आभार व्यक्त केले.