
करमाळा प्रतिनिधी
प्रो ऍक्टिव्ह अबॅकस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून दरवर्षी नॅशनल इंटरनॅशनल अशा परीक्षा घेतल्या जातात यामध्ये 2024- 25 या परीक्षेमध्ये भारतातून एकूण 12000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यापैकी कमलाई क्लासेसच्या एकूण 47 सहभाग नोंदवला. परीक्षेचे टार्गेट होते 6 मिनिटात 100 गणिते सोडवणे. क्लासेसच्या अनेक विद्यार्थ्यांनी हे टार्गेट कम्प्लीट केले. तसेच कमलाई अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी सिद्धी पृथ्वीराज देशमुख व दीक्षा दत्तात्रय दिवटे या दोन्ही विद्यार्थ्यांनी अबॅकस मध्ये मास्टरी मिळवली. सिद्धी पृथ्वीराज देशमुख ही भारतातील सर्वात लहान अबॅकस ग्रॅज्युएट वय वर्ष 11 ठरली. यांचा बक्षीस वितरण समारंभ 20 एप्रिल रोजी यश कल्याणी सेवाभवन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा पोलीस स्टेशन एपीआय गिरिजा मस्के मॅडम, पीएसआय बनकर, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील, विद्या विकास मंडळाचे विश्वस्त चंद्रशेखर शीलवंत सर, जातेगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक थोरात गुरुजी, स्वयम संस्कार केंद्राच्या संचालिका प्रा. डॉ. सारिका विटूकडे मॅडम हे उपस्थित होते.

या कार्यक्रमांतर्गत अबॅकसमुळे विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयांमध्ये झालेली प्रगती याविषयीचे काही डेमो सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पालकांनी मार्गदर्शकांबद्दल तसेच अबॅकस बद्दल आपली मत व्यक्त केली. प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना मस्के मॅडम यांनी अबॅकस काळाची गरज आहे. या शिक्षणाचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यायला हवा असे मत त्यांनी मांडले. शीलवंत सरांनी आजच्या बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि कमलाई क्लासेसच्या विद्यार्थ्यांमध्ये तुलना करत त्यांच्या गणितातील प्रगतीचे कौतुक केले. बनकर यांनी विद्यार्थ्यांना अबॅकस शिक्षणाप्रती प्रोत्साहित केले. विटुकडे मॅडम यांनी विद्यार्थी हा पालकांची देखील जबाबदारी आहे. पालकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल जागृत राहणे गरजेचे आहे. याबद्दल पालकांना मार्गदर्शन केले. थोरात गुरुजी यांनी विद्यार्थ्यांच्या विविध क्षमता विकास महत्त्वाचा आहे यावर त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासामध्ये अबॅकस सारख्या बौद्धिक खेळात्मक शिक्षणाची आवश्यकता आहे तसेच शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये विविध स्किल महत्त्वाची आहे यावर देखील त्यांनी मार्गदर्शन केले.

गणेश भाऊ करे पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले तसेच अबॅकस मध्ये यश मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि भविष्यामध्ये असेच विद्यार्थी करमाळाचे भविष्य ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये अशा अबॅकस सारख्या विविध शिक्षण पद्धतीची गरज आहे असे मत व्यक्त केले.
अबॅकस मध्ये मास्टरी मिळवलेल्या विद्यार्थिनींचे देखील खूप खूप कौतुक केले. यानंतर विद्यार्थिनींना यश कल्याणी सेवाभावी संस्थेकडून स्कॉलरशिप जाहीर केली. विद्यार्थ्यांना तसेच क्लासेसच्या संचालिकां मंजुश्री मुसळे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.