करमाळा प्रतिनिधी

कमलाई प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थिनी सिद्धी पृथ्वीराज देशमुख तसेच दीक्षा दत्तात्रय दिवटे या दोन्ही विद्यार्थिनींचे अबॅकस मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाले.

तसेच सिद्धी पृथ्वीराज देशमुख ही विद्यार्थिनी भारतातील सर्वात लहान अबॅकस ग्रॅज्युएट वय वर्ष 11 हा मान देखील तिने मिळवला. या दोन्ही विद्यार्थिनी कमलाई प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लासेस मध्ये काही वर्षापासून अबॅकस शिकत होत्या. अबॅकस चा आठही लेव्हलचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी अबॅकस मध्ये मास्टरी मिळवली. कमलाई अबॅकस क्लासेस नॅशनल कॉम्पिटिशन 2024 मधील यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा दिनांक 20 एप्रिल रोजी यशकल्याणी सेवाभावी संस्था या ठिकाणी करण्यात आला यावेळी या कार्यक्रमांमध्ये करमाळा पोलीस स्टेशन एपीआय गिरिजा मस्के मॅडम, पीएसआय बनकर, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील, विद्या विकास मंडळाचे विश्वस्त चंद्रशेखर शीलवंत सर, जातेगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक थोरात गुरुजी, स्वयम संस्कार केंद्राच्या संचालिका प्रा. डॉ. सारिका विटूकडे मॅडम हे उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर पालकांची उपस्थिती देखील होती. सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शिका मुसळे मॅडम यांचे खूप कौतुक केले. विद्यार्थ्यांना व पालकांना शिक्षणाविषयी, शिक्षण पद्धती विषयी तसेच विद्यार्थ्यांच्या क्षमतांच्या विकासाविषयी मार्गदर्शन केले.

या दोन्ही विद्यार्थिनींचा यावेळी बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये मास्टरी मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला सत्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि मेडल असे होते.  अबॅकस शिकल्यामुळे या विद्यार्थिनींच्या अभ्यासामध्ये बौद्धिक विकासामध्ये झालेल्या बदलाबद्दल विद्यार्थिनींनी आपले मत व्यक्त केले तसेच अनेक गणित विषयाच्या प्रश्नांची तोंडी उत्तरे काही सेकंदातच दिली.

विद्यार्थिनींची जिद्द चिकाटी अभ्यासू वृत्ती या सर्व या सर्व गोष्टी तसेच विद्यार्थिनींनी मनापासून अबॅकस शिक्षण घेऊन मास्टरी पूर्ण केली तसेच भारतातील सर्वात लहान अबॅकस ग्रॅज्युएट ठरणारी विद्यार्थिनी करमाळ्यातली सिद्धी पृथ्वीराज देशमुख ही झाली याबद्दल गणेश भाऊ करे पाटील यांनी या दोन्ही विद्यार्थिनींना यश कल्याणी सेवाभावी संस्थेकडून स्कॉलरशिप जाहीर केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलाई प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लासेसच्या संचालिका मंजुश्री मयूर मुसळे यांनी केले तसेच स्कॉलरशिप जाहीर केल्याबद्दल यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे आभार व्यक्त केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *