करमाळा प्रतिनिधी

आमदार नारायण (आबा) पाटील यांना सभासदांनी संधी दिली तसा कालावधी सुध्दा देतील असा विश्वास पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी व्यक्त केला.

आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या श्री आदिनाथ कारखाना संजिवनी पॅनलला भरगोस मतदान देऊन विजयी केले. पण आता अनेकांना हा कारखाना कधी सुरू होणार याबद्दल उत्सुकता लागली आहे. यावर सविस्तर बोलताना सूनील तळेकर म्हणाले की, आदिनाथ कारखाना उर्जित अवस्थेत आणण्यासाठी सभासदांनी आमदार नारायण आबा पाटील यांचेवर विश्वास ठेऊन एक संधी दिली. पण त्याच बरोबर सभासद आदिनाथ कारखान्याच्या बाबतीत काही कालावधी सुध्दा देतील. कारखाना हा अनेक वर्ष बंद असल्याने तीन स्तरावर काम केले‌ तर निश्चितच पुर्वावस्थेत येईल. एक म्हणजे आदिनाथ कारखान्याच्या विरोधात चालू असलेल्या न्यायालयीन दावे पर्रतिदावे यासाठी योग्य नियोजन करून न्यायालयीन लढाई प्रथम जिंकावी लागेल. पण त्याच बरोबर कारखान्याच्या उर्जित अवस्थेत आणण्यासाठी निधीची गरज असल्याने राज्य सरकारची हमी घेऊन अथवा कारखाना स्थावर मालमत्तेचे अचूक विवरण करुन राज्य व‌ देश पातळीवरील विविध बँकामधून कर्ज उपलब्ध करून घेणे गरजेचे आहे. यात जर न्यायालयीन दावे अडथळे निर्माण करत असतील तर सदर‌ दावे निकालात काढणे गरजेचे आहे. या दोन्ही पातळी बरोबरच जमीन स्तरावर कारखाना यांत्रीक स्थिती, ऊस लागवड, वाहतुक व्यवस्थेसाठी वाहतुक दारांचा विश्वास आदि बाबतही हंगामापुर्वी सकारात्मक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. परंतू वरील दोन‌ स्तरावर यश मिळाल्यास तिसऱ्या स्तरावरील काम हे वेगात व सहजगत्या होऊ शकते. या सर्व प्रक्रियेस काही महिने अथवा वर्षांचा कालावधी जरुर लागणार आहे. सभासद नक्कीच हा अवधी आमदार नारायण आबा पाटील व त्यांच्या संचालक मंडळास नक्की देतील असा विश्वास आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी व्यक्त केला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *