
करमाळा प्रतिनिधी
श्री देवीचा माळ येथील शामल दिगंबरराव बागल महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे ठेवीदारांची रक्कम परत मिळावी याबाबतचे निवेदन सहाय्यक निबंधक करमाळा यांना ठेवीदारांनी दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आम्ही श्रीदेवीचा माळ तालुका करमाळा येथील कायमचे रहिवासी असून आम्ही शेतीकामे मजुरी व्यवसाय करून उपजीविका भागवतो आम्ही श्रीदेवीचं माळ येथील शामल दिगंबरराव बागल महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमध्ये फिक्स डिपॉझिट पावत्या केलेल्या आहेत त्याची मुदत संपलेली आहे तर काहींना प्रापंचिक अडचणी करिता मुलांचे लग्न करिता हॉस्पिटलच्या औषधे उपचाराकरिता पैशाची अत्यंत गरज आहे. त्याकरिता आम्ही आमचे ठेवीचे पैसे परतावा मागितला असता पतसंस्थेचे संबंधित कर्मचारी पदाधिकारी वारंवार टाळाटाळ करत आहे तसेच सदर

पतसंस्थेमध्ये ठेवीस आणि देणे रकमेमध्ये तफावत येत असल्याबाबत समजते त्यामुळे सदर पतसंस्थेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. आम्हाला ठेविचा रकमेची अत्यंत गरज असल्याने आम्हाला आमची रक्कम परत मिळावी. पतसंस्थेची ठेवी व देणे बाबतची तपास बाबत योग्य ती चौकशी होऊन संबंधित यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी श्रीदेवीचा माळ येथे ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीची निवेदन जिल्हाधिकारी सोलापूर जिल्हा निबंधक सहकारी संस्था सोलापूर यांनाही देण्यात आले आहे. खाली सह्या करणारे ठेवीदार बिभीषण पवार, प्रमोद देशमुख, राजेंद्र मोरे, हिराबाई काशीद, वंदना काशीद, विनोद काशीद, शरद काशीद, संजय सोरटे, दयानंद पवार, महेश पवार, छाया पवार, शारदा गंधे, छाया सोरटे,

दीप्ती सोरटे, वृषाली आडेकर, चंद्रकांत पुराणिक, सुरेश सोरटे, यशोदा सुरवसे, अरुणा पवार, कमल पवार, किरण पोळ, प्रीती पोळ, योगिता बिडवे, मनस्वी बिडवे, स्वरा बिडवे, सोनाली थोरबोले, वेदांत थोरबोले, वर्षा फुलारी, सागर चव्हाण, सुनिता चव्हाण, वंदना चव्हाण, वृषाली आडेकर, दीप्ती सोरटे, माधवी चव्हाण, संगीता चव्हाण, पांडुरंग चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, श्रिया चव्हाण, सिद्धेश्वर सोरटे, रामलिंग सोरटे, मुक्ताबाई सोरटे, राहुल सोरटे, मयूर सोरटे, रेश्मा सोरटे, अक्षय बेंद्रे, वनिता दौंडे, आनंद साडेकर, नारायण मोरे, वर्षा पवार, छाया पवार, ईश्वर पवार, आशिष दोशी, रुद्रा पुराणिक, नारायण मोरे तनय बिडवे, भानुश्री बिडवे, दिलीप सोरटे, रोहन सोरटे, दिलीप सोरटे, ज्योती जामदार, संजय जामदार, नंदा जामदार, समर्थ जामदार, शरद जाधव, अश्विनी जाधव, रोहित चौधरी हे आहेत.