करमाळा प्रतिनिधी

31 मार्च रोजी रमजान ईद निमित्त करमाळा शहरातील ईदगाह मैदान येथे करमाळा शहरातील व तालुक्यातील हजारो मुस्लीम बांधवांच्या उपस्थित मुश्ताक काझी यांच्या मार्गदर्शनाखाली रमजान ईद ची नमाजपठण करण्यात आली असून खुदबा पठण मुजाहिद काझी यांनी करुन ईद उल फित्र ची नमाज पुर्ण करण्यात आली.

तसेच करमाळा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांचा करमाळा शहरात आणि तालुक्यात रमजान महिन्याच्या काळात योग्य असा पोलीस बंदोबस्त ठेवुन सामाजिक सलोखा कायम ठेवत सर्व समाजातील लोकांना योग्य असे समोपदेशन करुन समाजात जातीय तेढ निर्माण होणार नाही व जातीय तेढ निर्माण करणा-यांना योग्य असे शासन केले आहे

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सकल मुस्लीम समाजाच्या वतीने मार्गदर्शक व शहर काझी कलीम काझी सर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला आहे. यावेळी समीर शेख, मुजाहीद काझी, सुरज शेख, रमजान बेग, मुस्तकीम पठाण, इम्तियाज पठाण, अशपाक जमादार, अशपाक सय्यद पत्रकार, अलिम शेख पत्रकार, सोहेल पठाण,  इम्रान पैलवान, जमीर काझी व हजारो मुस्लीम बांधव उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *