
करमाळा प्रतिनिधी
रमजान ईद निमित्त श्रीराम प्रतिष्ठान येथे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने रमजान ईद ही सर्व सामान्य लोकांसोबत साजरी करण्यात आली आहे. यावेळी येथील लोकांना अन्नदान व शिरखुर्मा वाटप रोहीत दादा पवार फाऊंडेशनचे सदस्य मुस्तकीम पठाण ऊर्फ एम.डी. आणि जमीर सय्यद अध्यक्ष सकल मुस्लीम समाज करमाळा आणि सुरज शेख सचिव रहनुमा ट्रस्ट यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

तसेच मातोश्री वृद्धाश्रम पांडे करमाळा येथे रमजान बेग सचिव डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन यांच्या हस्ते वृद्धाश्रम मधील लोकांना शिरखुर्मा वाटप करण्यात आले आहे. कमला देवी मुकबधीर शाळा मधील लहान मुलांना शिरखुर्मा वाटप संस्थेचे उपाध्यक्ष जहाँगीर बेग यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तुम्ही समाजातील दुर्लक्षित आणि वंचित घटकांना आपल्या आनंदात सामील करून त्यांच्या सोबत आपला आनंद साजरा करा त्यां वृद्धांना, मुकबधीर मुलं आणि मुलींना आपण समाजात एकटे आहोत याची जाणीव न करता त्यांना आपल्या आनंदात सामावुन घ्या ते कोणत्याही समाजातील लोक असतील अशी शिकवण प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे शिकवण आहे या तत्त्वावर भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन चे कार्य आणि काम चालत आहे असे या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे स़ंस्थापक समीर शेख यांनी सांगितले आहे.
