करमाळा प्रतिनिधी  

“अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने सादर केलेले प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रम मोलाचे असून महिलांनी आता  घराच्या बाहेर किमान वर्षातून एकदा तरी बाहेर पडून आपल्या कलागुणांना वाव द्यावा”, असे आवाहन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी केले .

करमाळा नगरपालिका व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रबोधन वजा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्याधिकारी सचिन तपसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीजा मस्के, अखिल भारतीय ग्राहक पंचायत सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख माधुरी परदेशी, तालुका अध्यक्ष ब्रह्मदेव नलवडे, संघटक अजीम खान, पंचायत समितीच्या अधीक्षक माधुरी सपाटे, उपजिल्हा रुग्णालयाच्या आधीपरिचारिका ज्योती कडू – पाटील, करमाळा नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक धनंजय कविटकर, स्थापत्य अभियंता अश्विनी जाधव, अभियंता शितल बहाड, प्रकल्प अधिकारी तुषार टांगसाळे, लघु पाटबंधारे विभागाच्या स्थापत्य अभियंता माधुरी दिवाण, माजी नगराध्यक्ष सुनीता वाशिंबेकर, मुख्याध्यापिका एलिझाबेथ असादे, माजी नगरसेविका स्वाती फंड, जेऊर च्या मेहता मॅडम, वणवे मॅडम आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन, दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शितल चव्हाण यांनी प्रथम स्वागत गीत गायिले. त्यानंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या ललिता वांगडे, सारिका पुराणीक, विणा देवी यांनी ग्राहक गीत गायले.

यावेळी पुढे बोलताना तहसीलदार शिल्पा ठोकडे म्हणाल्या की, महिला या चूल आणि मूल यामध्ये गुंतून राहिलेल्या आहेत. त्यांनी घरातून वेळात वेळ काढून महिलांचे स्वातंत्र्य, अस्तित्व दाखवणे गरजेचे आहे. त्यांनी आपल्या कलागुणांना वाव देत घरातील तणावातून मुक्त होण्यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्यावा. याबरोबरच आपण सर्व जन्मापासून ग्राहक असल्याने विशेषता महिला ग्राहकानी जागृत राहुन कुठेही फसवणूक होऊ नये, म्हणून ग्राहक पंचायतीच्या प्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन तहसीलदार ठोकडे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवर व महिलांना पालिकेच्या वरिष्ठ लिपिक स्वाती माने-जाधव यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगत शपथ दिली. यावेळी भारत गॅस चे प्रतिनिधी गोपाळ वाघमारे यांनी खास महिलांसाठी गॅस बाबत महत्वाची सुरक्षा कशी घ्यावी याची माहिती दिली.

यावेळी ग्राहक प्रबोधन नाटिका द्वारे रेशन समस्या, विज समस्या, शिक्षण समस्या, ट्रॅव्हल्स एजंट कडून झालेली फसवणूक, बी बियाणे बाबत शेतकऱ्याची फसवणूक,  वर्तमान पत्रातील सत्य घटना हे नाटिका तुन सादर करून ग्राहक पंचायत कसे मार्गदर्शन करू शकतात हे हे विविध कार्यक्रमातुन व्यासपीठावर सादर करण्यात आले.

याप्रसंगी ग्राहक पंचायतीच्या प्रबोधनाबरोबर विविध कलागुण कार्यक्रम महिलांनी सादर केल्या. यामध्ये लेझीम नृत्य, लावणी, टाळ नृत्य, डॉटर मॉम,  साऊथ इंडियन डान्स, स्टँडिंग डान्स, वऱ्हाड निघालं लंडन ला एकपात्री प्रयोग, मोबाईल शाप की वरदान एकपात्री प्रयोग,  गणेश वंदना,  ग्राहक प्रबोधन नाटिका, सोलो डान्स, कॉमेडी,  हुंडा वरील नृत्य, रिमिक्स डान्स,  गीत गायन  असे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीजा मस्के आदी महिला अधिकाऱ्यांनी व्यासपीठावर महिलांसोबत फुगडी खेळून आनंद घेतला.

यावेळी निलेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी ग्राहक पंचायतीच्या स्थापनेपासून ग्राहकांचे हक्क व कायदे याबाबत माहिती दिली.

उपस्थित मान्यवरांचा सत्कार सारिका पुराणिक, ललिता वांगडे, निशिगंधा शेंडे,  सुलभा पाटील, माधुरी परदेशी यांनी केला.

यावेळी स्वाती माने, माया भागवत, सुवर्णा पाटणे यांनी महिलांना अधून मधून बौद्धिक प्रश्न विचारून बहारदार सूत्रसंचालन केले.

यावेळी सर्व सहभाग घेणाऱ्या महिला कलाकारांना बक्षिस देऊन गौरवण्यात आले. यावेळी माजी संघटक चक्रधर पाटील सर, भीष्माचार्य चांदणे सर, नितीन नलवडे, निलेश कुलकर्णी सर, रमेश शिंदे सर,संभाजी कोळेकर अजीम खान, शिवाजी वीर, अशपाक सय्यद, भीमराव कांबळे,  सारिका पुराणिक, ललिता वांगडे,  निशिगंधा शेंडे, मंजिरी जोशी, सचिवा नीलिमा पुंडे, सुलभा पाटील, विजय देशपांडे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी सर्वाचे आभार निशिगंधा शेंडे यांनी मानले.

……………………

चेहऱ्यावर हसू दिसण्यासाठीच महिलांच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते. वर्षातले एक दिवस तरी महिलानी मनसोक्त हसून खेळून आनंद घ्यायचा असतो. जन्मल्यापासून मरेपर्यंत प्रत्येकजण ग्राहक असतो. महिलावर्ग जाहिरातीला, प्रलोभनाला भाळून अनेक ठिकाणी फसत असतो, पण आपण काहीच करत नाही. यासाठी ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून कायदे ,हक्क, अधिकार याची माहिती घेऊन दाद मागावी – शिल्पा ठोकडे, तहसीलदार, करमाळा

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *