करमाळा प्रतिनिधी

घरातील किरकोळ कामासाठी घराशेजारीच असलेल्या सीना नदीतून एक पोते वाळू नेणाऱ्या शेतकऱ्याला पंचवीस हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलिसाला विरोध केल्याबद्दल शंभूराजे जयवंतराव जगताप यांच्यावर पोलिसांनी बोगस गुन्हा दाखल केला या घटनेचा शिवसेना तीव्र निषेध करत असून उजनीच्या पात्रातून रोज शंभर दीडशे टिप्पर वाळू चोरली जाती त्याकडे पोलीस व महसूल प्रशासन का लक्ष देऊन गुन्हे दाखल करत नाही. नगर जिल्ह्यातील पात्रातून रोज करमाळ्यात 30 ते 40 ट्रक वाळू येते ते महसूल प्रशासनाला दिसत नाही. मात्र घरातील कामासाठी सीना नदी घराजवळच असल्यामुळे त्यातून एक ठिके वाळू घेणाऱ्या वर एवढी कारवाई का ? असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित करून शंभूराजे जगताप यांच्या भूमिकेचे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी समर्थन केले आहे.

सामाजिक क्षेत्रात काम करत असताना एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाल्यानंतर तो पदाधिकारी म्हणून आमच्याकडे येत असतो त्याच्यावर झालेल्या अन्यायाची बाजू घेऊन जर प्रशासनाला जाब विचारला तर जा विचारणाऱ्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करायचा ही प्रवृत्ती लोकशाहीला घातक असून शहरातील व तालुक्यातील सर्व पक्ष गट तटाचे पदाधिकारी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांना निवेदन देणार असून खोटी फिर्याद देणाऱ्या पोलिसांवर व तलाठ्यावर निलंबित करावी व दाखल झालेल्या गुन्हा रद्द करावा अशी मागणी करणार आहे.

सध्या करमाळा तालुक्यातील सर्वच कार्यालयात प्रचंड भ्रष्टाचार सुरू असून कोणतेही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही. दोन नंबर धंदे बोकाळले आहेत. दारू, मटका, जुगार, चक्री, भांग, गांजा, मटका, गुटका, ट्राफिक एन्ट्री या सर्व अवैध धंद्या सह नशेचे इंजेक्शन खुलेआम मिळत आहे. सिटी सर्वे ऑफिस पासून ते खरेदी विक्री कार्यालयापर्यंत दलालांची टोळी निर्माण झाली आहे. पंचायत समिती जिल्हा परिषद बांधकाम असे कोणते खाते नाही की जिथे पैशाशिवाय काम होत नाही. करमाळ्यातील जनता मूग गळून गळून हे सहन करत आहेत. करमाळ्यात मोटार सायकल वर आलेला अधिकारी जाताना चार चाकी गाडीत जातो व करमाळ्यात आपला सातबारा उतारा निर्माण करतो हा आजपर्यंतचा अनेक अधिकाऱ्यांचा इतिहास आहे. विद्यमान लोक प्रतिनिधीचा प्रशासनावर वचक राहिला नाही.

एक ठीके वाळू चोरी बद्दल पोलिसांनी 23 हजार रुपये माझ्याकडून घेतले अशी तक्रार शेतकऱ्यांनी केल्यानंतर शंभूराजे जगताप यांनी या प्रकरणात उडी घेतली याचा राग मनात धरून शंभूराजे जगताप यांच्यावर गुन्हा दाखल केला. या गुन्हा दाखल प्रक्रिया होताना पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना कोणी कोणी फोन केले. याचे रेकॉर्ड तपासावी म्हणजे कोणाच्या राजकीय दवामुळे हा गुन्हा दाखल झाला याचाही तपास लागेल असा दावाही महेश चिवटे यांनी केला आहे.

……………………….

माझ्यावर खोटा 353 चा गुन्हा दाखल केला आहे. मी सध्या करमाळा शहरातच आहे पोलिसांनी स्वतःहून मला पकडून तुरुंगात नेऊन टाकावी. ही प्रक्रिया पोलिसांनी राबवली तर खऱ्या अर्थाने अधिकाऱ्यांचा चेहरा जनतेपुढे येईल – शंभूराजे जयवंतराव जगताप

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *