करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्याच्या दक्षिण भाग कायम दुष्काळी भाग आहे. पाऊस वेळेवर पडत नाही व अपुरा पडतो.

वडशिवणे तळे (तलाव) हा ब्रिटीश कालीन असलेने त्या तलावात पाणी नाही. त्यामुळे तलावाकाठच्या लोकांना पाणी मिळत नाही व शेती करता येत नाही.तरी तलावात पाणी सोडावे याबाबतचे निवेदन डॉ. केमकर यांनी दिले आहे.

उजनी धरणाचे बॅक वॉटरचे पाणी ६ कि. मी. अंतरावरून असून या तलावात पाणी सोडण्यासाठी कुठलेही प्रयोजन, नियोजन केले जात नाही. उलट बँक वॉअरवरून उपसा सिंचन योजना व बार्शी, माढा, उस्मानाबाद, येथे गेलेल्या असून ५ ६ कि. मी. बॅकवॉरपासून असलेला तलाव मात्र तहानलेला आहे. त्याला कोणी वाली नसल्याचे जाणवते.

कृपया धरण भरल्यानंतर तरी बॅक वॉटरचे पाणी तलावात सोडणेस सर्व वडशिवणे ग्रामस्थ तसेच केमचे ग्रामस्थ यांची बऱ्याच वर्षाची मागणी आहे.

तेंव्हा वडशिवणे तलावात पाणी (चारी किंवा कालव्याव्दारे) सोडणेस नम्र विनंती आहे.

सद्यस्थितीत ११० टी. एम. सी. पाणी आपले डेाळ्या देखत उजनी धरणातून वाहुन गेलेले आहे. परंतु त्यातील १ थेंब सुध्दा पाणी वडशिवणे तलावात येत नाही ही खेदाची बाब आहे. त्यात केम व वडशिवणे ग्रामस्थांचा काय दोष आहे. तेंव्हा वडशिवणे तलावावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांलाही वडशिवणे तलाव भरणे गरजेचे आहे. असे डॉ. केमकर यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *