करमाळा प्रतिनिधी

देवराव पंचफूला मारुती चव्हाण यांचे तालुका कृषि अधिकारी करमाळा या कार्यालयास महाराष्ट्र राज्यातील पहिले  रेकॉर्डसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे ISO 9001 :2015 मानांकन प्राप्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय करमाळा तालुका – करमाळा जिल्हा

– सोलापूर आपले सर्वांचे, आपले, आमचे, माझे तालुका कृषी अधिकारी – करमाळा या कार्यालयास आपले सर्वांचे सहकार्य, मदत, सल्ला, पाठबळ, पाठीवरील हात यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे 162 देशात काम कार्यरत असलेले व हजार पेक्षा जास्त देशात मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय स्टॅंडर्ड ISO 9001 : 2015 आंतरराष्ट्रीय मानांकन दिनांक 31 मार्च 2025 ते 31 मार्च 2028 या कालावधीसाठी प्राप्त झाले आहे. हे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील मंडळ कृषी अधिकारी अनिल चव्हाण,  मधुकर मारकड, देविदास चौधरी, काशिनाथ राऊत सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्य्क, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा करमाळा कार्यालयीन कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी, पत्रकार, वार्ताहार व या कार्याल्याच्या अधिनस्थ असलेले ISO 9001:2015 मानकांन मिळविलेले मंडळ कृषी अधिकारी जेऊर मधुकर मारकड यांचा खारीचा वाटा आहे.

महा डिबिटी वर येणाऱ्या सर्व योजनामध्ये निधी वितरणात मागील सलग 3 वर्षे राज्यात प्रथम क्रमांक वर करमाळा तालुका आहे. केळी पीक क्षेत्र विस्तार व निर्यात हब साठी केलेले कार्य, ठिंबक सिंचन व यात्रीकरण मध्ये पुणे विभागात सर्वोच्च काम व अनुदान वाटप कार्य, शेतकरी व कर्मचारी यांचेसाठी शुद्ध जल, आपत्कालीन व्यवस्थापनासाठी अग्निशमन यंत्र व प्रथमोपचार पेटी, मौखिक व लेखी मार्गदर्शन, शेतकरी अभिप्राय, कृषी ग्रंथालय, कृषी वस्तू संग्रहालय, अदयावत शेतकरी माहिती व प्रशिक्षण कक्ष, नगण्य प्रलंबितता, फ्लो चार्ट, माहिती चार्ट, अभिलेख वर्गीकरण, सुसज्ज बैठक व्यवस्था, प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यास आईच्या नावासह नाव निर्देशित प्लेट, सर्वांना आयकार्ड, सर्वधर्मसमभाव साठी एक गणवेश, तालुका कृषी अधिकारी कार्यक्षेत्रातील सर्व गावांचा अद्यावत मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये सुपीकता निर्देशांक चार्ट, अधिकारी कर्मचारी यांचे गावभेटीचे दिवस सह सूक्ष्म नियोजन, कृषी व शेतकरी कुटुंब सेवार्थ कार्य, राज्य व केंद्रशासन धोरण व योजना यांची उत्कृष्ट अंमलबजावणी, कार्यालय रंगरंगोटी, AI तंत्रज्ञान यांचा वापर इत्यादी अनेक बाबींची अंमलबजावणी नंतर सर्वेक्षण वअंकेक्षण, ॲडीट वर आधारित आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा मानांकन मिळवण्याचा मान या कार्यालयास प्राप्त झाला आहे. 

सर्व शक्य सबका साथ सबका प्रयास और सबका विकास मुळे प्रत्यास आले आहे धन्यवाद !!

हम सब बनाऐ बेहतरीन से बेहतर !!

यासाठी आपली भेट सुचना सुजाव सल्ला व सस्नेह निमंत्रण आमंत्रण

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *