करमाळा प्रतिनिधी

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून जगताप गटाने माघार घेतल्याचे आवाहन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आज कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.

जगताप म्हणाले की, कै. शंकरराव मोहिते पाटील ते माजी खासदार अरविंद कांबळे यांच्या कार्यकाळ पर्यंत कारखाना चांगला चालला होता. माझ्या काळात शेतकऱ्यांना उत्तम असा दर दिला होता. त्यानंतर आदिनाथ कारखान्याकडे जे पुढारी आले त्यांनी कारखान्याचे योग्य नियोजन केले नाही. शेतकरी कामगारांचे यामुळे नुकसान झाले आहे. कारखाना कर्जाच्या खाईत गेला आहे. अनेक अडचणीचा सामना कारखान्याला करावा लागणार आहे. कारखाना चालू करायचा असेल तर वरिष्ठाकडून निधीची आवश्यकता आहे परंतु सत्ताधारी मंडळींकडेच निधीची कमतरता आहे. अशा अनेक समस्या आहेत. सर्व जगताप गटाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून दोन दिवसांत अर्ज मागे घेण्याचा निर्णय झाला आहे असे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सांगितले आहे.

यावेळी युवा नेते शंभूराजे जगताप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, आजी माजी पदाधिकारी व जगताप गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *