करमाळा प्रतिनिधी

सुमंतनगर करमाळा या ठिकाणी ब्ल्यु पँथर ग्रुप व ब्ल्यु पँथर सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्या तर्फे पवित्र रमजान महिना रोजा करणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी ग्रुपच्या वतीने इफ्तार पार्टीचे नियोजन करण्यात आले. ग्रुपच्या माध्यमातून समाजात सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ग्रुपच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक

उपक्रम राबविण्यात येत असतात. त्यातच या वर्षी पासून इफ्तार पार्टीचे आयोजन सुरू करण्यात आले आहे आणि या पुढे ही परंपरा अशीच चालू राहणार असे ग्रुपचे संस्थापक आशुतोष (भाऊ) शेलार यांनी जाहीर केले. या इफ्तार पार्टीला करमाळा शहरातील मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव तसेच इतर बहुजन बांधवही उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रुपचे सोहेल दारूवाले, अरबाज पठाण, शंभू आहेर, बादल बडेकर, तुषार बडेकर, अजहर मुलानी, अभिजित सूर्यवंशी, आकाश धनवे,सनी ताकतोडे, आकाश कुंभार, प्रशांत राजपुरे,  मंगेश ओहोळ, सुमित साखरे, हेमंत भागवत, अलीम शेख, अनिकेत नाळे, जीत भागवत, मुस्ताक शेख, निहाल बडेकर, जहांगीर मुलानी, अनिस मुलानी आणि ग्रुपच्या बाकी सर्व सदस्यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी खूप परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *