करमाळा प्रतिनिधी

मांगी तलावातुन १६ मार्च पासून लाभक्षेत्रातील गावांसाठी पाणी सोडणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. अधिक बोलताना  त्यांनी सांगितले की, करमाळा  तालुक्यातील सर्वात मोठा तलाव म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मांगी तलावात सध्या 69 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या तलावातुन चारी मार्फत लाभक्षेत्रातील सात गावांना शेतीसाठी पाणी दिले जाते. सध्या शेतकऱ्यांना गुरांच्या चारा व पाण्यासाठी दुसरा पर्याय नाही. शिवाय लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी

मागणी अर्ज भरुन दिले असल्याने पाणी आवर्तन देण्याची सुचना आपण संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यानूसार दि. १६ मार्च पासून मांगी तलावातुन परिसरातील गावांसाठी पाणी दिले जाईल. यातुन मांगी-पोथरे ६०० हे., पोथरे, खांबेवाडी करंजे ५०० हे., पोथरे निलज ४४७ हे., बिटरगाव ४११ हे., करंजे भालेवाडी ६०० हेक्टर असे अंदाजे सुमारे ३००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. उजवा कालवा २० किमी तर डावा कालवा ७ किमी पर्यंत पाणी पोहचवून जवळपास १२००

शेतकऱ्यांना या उन्हाळ्यात या आवर्तनाच्या माध्यमातून फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी आपणास संपर्क साधावा असेही यावेळी आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. तर आमदार नारायण आबा पाटील यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन तसेच कुकडीची दोन आवर्तने या दोन महिन्यांत दिली असुन येत्या आठवडाभरात दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन देण्याचे आदेश आमदार नारायण आबा पाटील यांनी संबंधित विभागास दिले आहेत. तसेच सीना कोळगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन लवकरच सुरु होईल. यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना कुकडी, दहिगाव उपसा, मांगी मध्यम प्रकल्प व सीना कोळगाव उपसा सिंचन योजना तसेच भीमा सीना जोड कालवा या माध्यमातून एकाच वेळी पाणी देण्याचे महत्वाचे काम आमदार नारायण आबा पाटील यांनी करुन दाखवल्याने करमाळा तालुक्यातील शेतकरी समाधान व्यक्त करत असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *