
करमाळा प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष (भैय्या) देशमुख यांची अमानुषपणे झालेल्या हत्येच्या निषेधार्थ व धनंजय मुंडेला मुख्य सुत्रधार करुन गुन्हा दाखल करावा या मगणीसाठी स्वंयमफुर्तीने गुरुवार दिनांक ६/०३/२०२५ रोजी करमाळा शहर व तालुका बंद ठेवणे बाबतची सकल मराठा समाज करमाळा व बहुजन बांधव करमाळा यांच्यावतीने विवीध मागण्या करत करमाळा शहर व तालुका बंदची हाक देण्यात आलेली आहे असे निवेदन तहसीलदार करमाळा यांना सकल मराठा समजाच्या वतीने देण्यात आले आहे.

निवेदनातील मागण्या पुढील प्रमाणे :
मस्साजोग घटनेचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांना मुख्य सुत्रधार आरोपी करण्यात यावे, स्व. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना भर चौकात फाशीची शिक्षा मिळावी, स्व.संतोष देशमुख हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. आरोपींचे व्हि.डी.ओ. फोटो कोर्टात आरोप पत्रात दाखल केलेले आहेत हाच ठोस पुरावा आहे, स्व. संतोष देशमुख यांची ज्याप्रकारे आमानुषपणे कपडे काढुन मारहाण केली, तसेच वाईट प्रवृत्तीच्या आरोपींनी स्व. संतोष देशमुख यांना मारहाण होत असतानाचे व्हि.डी.ओ. कॉल करुन व व्हि.डी.ओ. काढून कोणाकोणाला पाठविले त्या सर्वांना आरोपी करावे.

वरील सर्व मागण्या महाराष्ट्र शासनाने कोणासही पाठीशी न घालता पुर्ण कराव्यात. मस्साजोग येथील घडलेली घटना ही मानवतेला काळीमा फासणारी आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशी प्रवृत्ती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मुळासकट संपवावी असे आवाहन करण्यात येत आहे. स्व संतोष देशमुख यांना मारत असताना आरोपी ज्या प्रकारे मारताना आनंद घेत होते ही खरोखर किती क्रूरतेची बाब आहे. या अमानुष कृत्याचा सकल मराठा समाज करमाळा व बहुजन बांधव करमाळा यांच्या वतीने करमाळा शहर व तालुका बंद व जाहिर निषेध…..!
बारावी व दहावी चे पेपर चालू असल्याने एस.टी सुविधा चालू राहणार आहे असेही निवेदनात म्हटले आहे.
माहितीस्तव प्रत मुख्यमंत्री व गृहमंत्रालय महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री (दोन्ही), जिल्हाधिकारी सोलापूर, जिल्हा पोलीस अधिक्षक सोलापूर, करमाळा पोलीस ठाणे करमाळा यांना देण्यात आले आहे.