
करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या सोलापूर संपर्कमंत्री म्हणून जबाबारादरी घेतली. राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अजितदादा यांच्या देवगिरी या निवासस्थानी सर्व मंत्री आमदार जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांची महत्त्वाची बैठक संपन्न

झाली. या बैठकीला करमाळा तालुक्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे हे देखील उपस्थित होते. पक्षाची पुढील रूपरेखा आगामी काळात पक्षाचा अजेंडा आणि वाटचाल या विषयावर राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत पक्ष संघटनेला ताकत देण्याकरीता राज्यातील विविध जिल्हय़ाचे संपर्कमंत्री म्हणून

मंत्रीमंडळातील मंत्री यांना जबाबदारी देण्यात आली. यामध्ये सोलापूर जिल्ह्याची संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतली. अजितदादा सोलापूरचे संपर्कमंत्री झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून आनंद व्यक्त होत आहे. येणाऱ्या काळात अजित दादा सोलापूर संपर्कमंत्री झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न तसेच पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते यांची कामे मार्गी लागून सोलापूर शहर व संपूर्ण जिल्ह्यात विकास होऊन राष्ट्रवादीची ताकत वाढणार आहे असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक भैय्या आव्हाड यांनी सांगितले.