
करमाळा प्रतिनिधी
१ एप्रिल ते ३१ मे असा ३००० कि.मी. चा प्रवास करून सासर ते माहेर संदेश रथयात्रा त्यांचा विचार कार्याचा प्रसार जागृती करत जाणार ३० जिल्हे ३०० तालुके आणि हजारो गावातून पोचणार आहे.
धर्म समाज दानधर्म आणी मंदिरांचे जीर्णोद्धाराचे लोकोपयोगी काम करणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची यावर्षी ३०० वी जन्मतिथी आहे. या निमित्ताने अनेक कार्यक्रमाचे आयोजन आहे. यात एक भव्य दिव्य जनजागृती

संदेश रथयात्रेचे आयोजन सकल धनगर मल्हार सेनेतर्फे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद सोरमारे हे या इंदूर ते चौंडी (सासर ते माहेर) जन्मस्थळ या संदेश यात्रेचे मुख्य आयोजक आहेत. या यात्रेचा मुख्य उद्देश हा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा त्यांच्या विचारांचा प्रसार प्रचार व्हावा आणि धनगर समाजात जागृती यावी सकल धनगर समाज एकत्र यावा. या यात्रेनिमित्त नुसता धनगर समाज नव्हे तर सकल हिंदू समाज एक व्हावा आणि त्यांनी देखील धनगर

समाजासोबत या संदेश यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असा आहे. (इंदूर ते चोंडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चौंडी जन्मस्थळ आहे) ही भव्यदिव्य राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संदेश रथयात्रा ही ३००० किलोमीटरचा प्रवास करून ३० जिल्ह्यातून आणि तीनशे तालुक्यासह हजारो गावांमधून जाणार आहे ६० दिवस ही संदेश रथयात्रा चालणार आहे. तरी सर्व समाजातील समाज बांधवांनी महिला भगिनींनी या रथयात्रेचे गावोगावी जंगी स्वागत करून बहुसंख्येने आपापल्या ठिकाणाहून सहभागी होण्याचे आवाहन घारगावच्या माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी संजय सरवदे यांनी केले आहे.