करमाळा प्रतिनिधी

भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी ‘राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद’ आणि ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या’ अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.

त्याचप्रमाणे सालाबाद प्रमाणे याही वर्षी 28 फेब्रुवारी रोजी स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. या नंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट्स, विज्ञान प्रयोग तसेच गणितातील संख्यज्ञान, बेरीज, वजाबाकी, पाढे इ.विषयीचे प्रदर्शन भरवले होते. यामध्ये ज्वालामुखी, सूर्यमाला, जलचक्र, पाण्याची घनता, हवेचा दाब इ. प्रयोग सादर करण्यात आले होते. आजच्या विज्ञान दिनाचे विशेष म्हणजे यामध्ये प्री-प्रायमरी च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी तसेच सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली होती.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *