करमाळा प्रतिनिधी

केम ढवळस हा जिल्हा प्रमुख मार्ग क्रं. 14 रेल्वे लाइन कि.मी. क्र.359/26 359/28 या मार्गांवर रेल्वे लाईन असल्यामुळे केम गावाच्या रेल्वे लाईन पलिकडे छोटी मोठी सुमारे सात ते आठ्‌ गावे असून केम ढवळस व इतर गावांना जोडण्यासाठी व येण्या जाण्या व दळणवळण करण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नसल्यामुळे येथील लोकवस्ती अनेक गावातील लोकांना व आजूबाजूला असणाऱ्या अनेक गावातील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

रेल्वे मार्गाच्या अलीकडील व पलीकडील गावातील लोकांना पाऊस पडल्यावर येण्या जाण्यासाठी अडथळा निर्माण होऊन सदर गावातील लोकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना रेल्वे लाईन ओलांडून येणे जाणे करावे लागते त्यामुळे त्याच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो.

या कारणास्तव रेल्वे प्रशासन यावर लक्ष घालून लोकांच्या सेवेसाठी केम ढवळस जिल्हा प्रमुख कि.मी क. 359/26  359/28 या मधून RUB भुयारी मार्ग रेल्वे प्रशासनाने बनवून द्यावे अशी मागणी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी पत्रादवारे केली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासन IWD प्रमुख आधिकारी प्रसाद जोशी व सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा कुर्डूवाडी लोकरे यांनी मिळून सर्वे करून प्रस्ताव रेल्वे विभाग सोलापूर यांच्याकडे पाठवून दिला व सोलापूर मंडल रेल्वे प्रबंधक डॉ. सुजित मिश्रा व ताजऊदीन यांच्याकडून केम ढवळस रेल्वे मार्गावरील भुयारी मार्गाला तीन ते चार महिन्यांमध्ये मंजुरी मिळून काम लवकर चालू होणार आहे अशी माहिती दिली.

रोज सकाळी दौंड व सोलापूर येथे शेतकरी वर्ग, शालेय विद्यार्थी व कर्मचारी लोकांना येण्या जाण्यासाठी लवकरच शटल चालू होईल असेही आश्वासन देण्यात आले. त्यामुळे केम गावा मध्ये व लोकवस्ती आजूबाजूच्या गावामध्ये आनंद व्यक्त होत आहे. याचा सर्व पाठपुरावा प्रहार संघटना करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर हे करत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *