करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कुकडी व‌ दहिगाव उपसा योजनेची आवर्तने सुरु असून आठवडाभरात सीना कोळगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन देणार असल्याची माहिती विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली. याबाबत अधिक सविस्तर माहिती देताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की, करमाळा तालुक्यातील रब्बी पिकांसाठी

सध्या गेले महिनाभर झाले दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन चालू आहे. तर काल पासुन कुकडीचेही आवर्तन सुरु झाले असून करमाळा लाभक्षेत्रातील तलाव व‌ जलसाठे यात पाणी उपलब्ध करुन देण्यास सुरुवात झाली आहे. आपण मागणी केल्यानुसार हि दोनही आवर्तने सुरु असुन करमाळा तालूक्यासाठी राखुन ठेवलेल्या पाण्यातुन जास्तीत जास्त पाणी या आवर्तनात कसे मिळेल यासाठी आपले विशेष प्रयत्न राहतील. तर कोळगाव धरणावर कार्यरत असलेल्या सीना कोळगाव

उपसा सिंचन योजनेचे एक आवर्तन आम्हाला मिळावे अशी आग्रही मागणी आपण धाराशिव येथे पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली होती. त्या नुसार आता या योजनेच्या आवर्तनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असुन आठवडाभरात हे आवर्तन सुरू होईल. कुकडीच्या माध्यमातून ४०० एमसी एफ टी तर दहिगाव उपसा योजनेचे ३०० एमसी एफ टी पाणी सध्या तालूक्यासाठी दिले जात आहे. सीना कोळगाव उपसातुन ३०० एमसी एफ टी पाणी आपण मागितले आहे तर एक मार्च पासुन दहिगाव उपसाचे उन्हाळी आवर्तन सुध्दा सुरु करत आहोत. या उन्हाळी आवर्तनासाठी ३०० एमसी एफ टी पाणी मिळणार आहे. अशा रितीने आपण करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या सव्वा टि एम सी पाणी उपलब्ध करुन देत आहोत. साहजिकच यातून शेती उत्पादन वाढणार आहे. या सर्व‌ पाणी वाटप नियोजनावर आपण बारकाईने लक्ष ठेऊन असुन लाभक्षेत्रातील सर्व भागात पाणी पोहोच करण्यावर आपला भर राहणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.

करमाळा तालुक्यात एकाच हंगामात कुकडी, दहिगाव उपसा व सीना कोळगाव उपसा सिंचन योजना सुरु होण्याची ही पहिलीच वेळ असुन याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर शेतकरी समाधान व्यक्त करत असुन सोशल मीडिया वर सध्या पाण्याच्या पोस्ट मोठ्या प्रमाणावर फिरत असल्याचे दिसून येत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *