
कमलाई नगरी
मोडनिंब येथे वार्ड क्रमांक पाच दत्तनगर परिसरामध्ये मा.खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या खासदार निधीतून दहा लक्ष रुपये च्या विकास कामाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्ष योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटन प्रसंगी उपस्थित भारतीय जनता पार्टी माढा तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. मोडनिंब सरपंच प्रतिनिधी राहुल पाटील, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत कुंभार गुरुजी, पोलीस बॉईजचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटोळे, डॉक्टर

प्रदीप पाटील, भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा कार्यकारणी सदस्य धनाजीभाऊ लादे, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष वकील गणेश सुर्वे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, किसान मोर्चा मोडनिंब शहराध्यक्ष विशाल पाटील, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष शहाजी माळी, ओबीसी सेल शहराध्यक्ष अमोल काटकर, एस.सी. शहराध्यक्ष विनायक खिलारे, सागर शेलार, संतोष चवरे, नकुल खंदारे, श्याम तात्या काटकर, रोहित कणसे, भारत गुमते, सुभाष सुर्वे, निखिल सुर्वे, प्रशांत खिलारे, मोडनिंब परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.