करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री देवीचामाळ येथील श्रीमंत राजे राजे रावरंभा निंबाळकर राजे यांच्या पदस्पर्शाने श्रीदेवीचा माळ पावन नगरीत श्रीमंत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव उत्साहाने पार पडला. यावेळी श्रीदेवीचा माळ येथील शिवजयंती उत्सव समिती सौरभ चव्हाण, रोहित चौधरी, विनायक भोसले, वैभव पवार, आदित्य पवार यांनी अतिशय नियोजनबद्ध शिस्तबद्ध शिवजयंती कार्यक्रम राबवून मिरवणुकीचे आयोजन केले. यामध्ये वेगवेगळे बँड पथक व राजे राव रंभा तरुण मंडळ श्रीदेवीचा माळ येथील लेझीम पथक विशेष आकर्षण होते. त्याचप्रमाणे शिवजयंती मिरवणूक काढून शहरातील शिवछत्रपती चौक येथे छत्रपतींच्या शिवस्मारकाला भेट देऊन व विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

श्रीदेवीचा माळ येथील शिवजयंती उत्सव मिरवणुकीचे उद्घाटन श्रीदेवीचा माळ येथील नूतन सरपंच संतोष भाऊ पवार व करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन (मालक) गायकवाड, मराठा महासंघाचे अध्यक्ष सचिन काळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन भाऊ चोरमले, शिवसेना तालुका उपप्रमुख अंगद दादा बिडवे, माजी सरपंच श्रीराम आप्पा फलपले, प्रवीण हिरगुडे, प्रभाकर धोंडे, पोलीस पाटील मनोज जामदार, तुषार आबा जगताप, रोहित सोरटे, मनसेचे श्रीकांत चव्हाण यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन झाले. यावेळी उपस्थित श्रीदेवीचा माळा येथील नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी युवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सर्व ग्रामस्थ व गावकऱ्यांनी सहभाग घेऊन मिरवणुकीची सांगता केली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *