करमाळा प्रतिनिधी

जातेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती सुधारणा योजने अंतर्गत मंजूर ५ लाख रूपये निधीचे चालू असलेले पेव्हींग ब्लॉकचे काम स्थगित करण्यात यावे या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने २४ फेब्रुवारीला पंचायत समिती कार्यालय समोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे; अशी माहिती दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष दिपक आरणे यांनी दिली. याबाबत आरणे यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की जातेगाव येथे डॉ.

बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती सुधारणा योजने अंतर्गत मंजूर निधी ५ लाख रूपयामधून काम चालू असून पेव्हींग ब्लॉकचे काम समान वाटप समाजामध्ये न होता सरपंच यांनी आपल्या घरासमोरच सदरील काम चालू केलेले आहे. त्यांनी योजनेच्या निधीचा उपयोग इतर ठिकाणी न करता स्वत:चेच घरासमोर केलेला आहे. सदरील योजने अंतर्गत जातेगाव येथील दलित वस्तीमध्ये विकासकामे करणे गरजेचे असताना सरपंच हे वैयक्तीक हव्यासापोटी सदर योजनेचा निधी हा स्वत:च्याच

घरासमोर वापरत आहेत. तरी सदरील योजनेच्या मंजूर निधीचा उपयोग सरपंच यांनी चुकीच्या पध्दतीने केलेला आहे. त्यामुळे सदर योजनेचा निधी दलित वस्तीमधीलच विकासकामांसाठी करण्याबाबतच्या सूचना आपले स्तरावरून सरपंच, ग्रामसेवक यांना देण्यात याव्यात… अशा आशयाचे पत्र गटविकास अधिकारी यांना सुरूवातीला दिले होते. तरीही ग्रामपंचायतीचे सदरचे काम चालू केलेले आहे. तरी सदरील काम स्थगीत करण्यात यावे व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांचेवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा २४ फेब्रुवारीला पंचायत समिती कार्यालय समोर दलित महासंघाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल; असाही इशारा दिपक आरणे, तालुका उपाध्यक्ष तानाजी लोंढे यांनी दिला आहे.

यावेळी दलित महासंघाचे शहराध्यक्ष बापू जाधव, कार्याध्यक्ष नामदेव पोळ, तालुका संघटक प्रदीप आलाट, कार्यकर्ते गराख ससाणे यांचेसह दलित महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *