
करमाळा प्रतिनिधी
वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 वी जयंती निमित्त श्रीराम प्रतिष्ठान येथे भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने अन्नदान वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी प्रमुख

उपस्थिती मुंबई हायकोर्टाचे प्रसिद्ध वकील व करमाळ्याचे सुपुत्र विक्रांत विलासराव घुमरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी सकल मुस्लीम समाज चे शहर अध्यक्ष जमीर सय्यद, ए.पी.जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन चे सचिव रमजान बेग, भारतीय जनता पार्टी करमाळा चे उपाध्यक्ष राजु सय्यद, कुरेशी समाज चे अजिम कुरेशी व श्रीराम प्रतिष्ठान चे व्यवस्थापक महादेव गोसावी व मुस्लीम समाजातील मावळे उपस्थित होते.
