कमलाई नगरी

                 महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा जिल्हा सांगली यांचे वतीने सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य सलून व्यवसायिकांच्यासाठी स्वच्छ दुकान सुंदर दुकान अशी स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील साडेसातशे सलुन व्यवसायिकांनी सहभाग नोंदवला. सर्व १० तालुक्यातील नाभिक समाज बांधव उपस्थित होते.प्रत्येक तालुक्यातून तीन आणि जिल्हास्तरावर तीन आशा निवडी करण्यात आल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ करण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय सयाजीराव झुंजार (मामा) विभागीय अध्यक्ष बाबासाहेब काशीद प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे (सर) राज्य कार्यकारणी सदस्य विनोद कदम जिल्हाध्यक्ष जयंवत (तात्या) सूर्यवंशी उपस्थित होते.

             25 वर्षांपूर्वीचा सलुन व्यावसाय आणि सध्याचा सलुन व्यावसाय आहे यामध्ये आलेली आधुनिकता आणि झालेली प्रगती याविषयी आदरणीय झुंजार साहेब यांनी व्यवस्थित  मार्गदर्शन केले, आपला व्यवसाय ही समाजाची गरज असून ती सर्विस इंडस्ट्री आहे आणि तिला योग्य पद्धतीने हाताळल्यास त्या पद्धतीने आपल्याला लोक पैसे सुद्धा देण्यास तयार आहेत अशी भावना व्यक्त केली. संघटनेसाठी काम करताना परमेश्वर आपली काळजी घेतो कोणत्याही परिस्थितीत आपले नुकसान होऊ देत नाही असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. प्रत्येकाने मी ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीसाठी काहीतरी करण्याची गरज असल्याचे आणि ते  मातृपितृ  ऋण आहे असे समजून काम करण्याची गरज आहे.त्यानी केलेल्या मार्गदर्शनामुळे समस्त उपस्थित नाभिक समाज बांधवांच्या मध्ये एक ऊर्जा निर्माण झाली.

      महामंडळ ही समाजाची मातृ संस्था असून महाराष्ट्र नाभिक महामंडळासाठी प्रत्येकाने अविरत काम करावे याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी महामंडळामध्ये काम करायला इच्छुक असणाऱ्या अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात भाष्य केले त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील एक तरुण तडफदार कार्यकर्ते प्रवीण क्षीरसागर यांना पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा अध्यक्ष म्हणून निवडीची घोषणा केली.प.महा.विभागीय अध्यक्ष बाबासाहेब काशिद यांनी कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे सांगली जिल्ह्याचे काम असावे, महाराष्ट्रातील सहाही विभागांमध्ये प.महा.चे काम उत्तम असेल असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.

         आदरणीय सयाजी मामा तुम्ही आज सांगली जिल्ह्यातील तासगाव या ठिकाणी आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात. आम्हाला योग्य दिशा आणि सामाजिक मार्गदर्शन केले हे तुमचे ऋण सांगली जिल्हा निश्चितपणे कधीही विसरणार नाही. तुमच्या रूपाने महाराष्ट्र नाभिक महामंडळाला एक अद्वितीय नेतृत्व लाभले आहे. नाभिक समाजाच्या उत्कर्षासाठी तुम्ही तुमच्या या घोडदौडीमध्ये सांगली जिल्हा कधीही मागे असणार नाही. ही भावना  प्रा.सोमनाथ साळुंखे अध्यक्ष जयवंतराव सूर्यवंशी तसेच अन्य समाजातील सर्वच नेत्यांनी व्यक्त केली मी खरंच सांगतो सयाजी मामा महाराष्ट्रातील सर्व सामान्य नाभिक समाजाला तुमच्या विचाराने तुम्ही प्रेरित कराल आणि नवीन पिढीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाल याची खात्री वाटते तुम्हाला आमच्याकडून खूप शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद

प्रा.सोमनाथ साळुंखे,जयंवतराव सुर्यवंशी,ॲड.लोखंडे, बापूसाहेब वाघमारे,उषा (माई) गायकवाड,नितीन खंडागळे, विशाल गायकवाड, मधुकर गायकवाड, जालिंदर खंडागळे,,आर.के.रोकडे,नंदु (आप्पा) सपकाळ, कल्याण काळे, गजानन सपकाळ, नितेश यादव, रविंद्र पवार, प्रविण सुर्यवंशी, डॉ सिध्देश्वर वाघमारे, प्रकाश खंडागळे, अनिल बन्ने,राजू काळे, संतोष खंडागळे शशिकांत जाधव

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *