करमाळा प्रतिनिधी

पालकमंत्री जयकुमार गोरे व मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दलित महासंघाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या (महामंडळ) जिल्हा बॉडीवर दलित महासंघाला स्थान मिळावे व कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना अंतर्गत दलित समाजाकरिता जमीन मिळावी असे निवेदन देण्यात आले.

भाजप शिवसेना महायुती मध्ये प्रा.डॉ. मच्छिंद्र सकटे सर यांचा घटक पक्ष म्हणून दलित महासंघ ओळखला जातो. त्या अनुषंगाने 2024 मधील लोकसभेतील उमेदवार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दलित महासंघाने पाठिंबा जाहीर केला होता त्या अनुषंगाने प्रामाणिकपणे भाजप महायुतीचे कार्य दलित महासंघ करीत असून त्याकरिता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जिल्हा बॉडीवर दलित महासंघाच्या कार्यकर्त्यास संधी मिळावी व महाराष्ट्र राज्याच्या दलित व

भूमीहीन समाजाकरिता कर्मवीर बाबासाहेब गायकवाड सबलीकरण योजना चांगली असून त्या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसून भूमिहीन दलित समाजाची उन्निती होत नसून त्याकरिता महाराष्ट्र शासनाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेची अंमलबजावणी होऊन त्या प्रलंबित असलेल्या अर्ज निकाली काढून वर्ग 2 च्या जमिनीचे खरेदीचे आदेश तहसीलदार यांना देण्यात यावे व आपल्या आदेशाची अंमलबजावणी होऊन दलित समाजाच्या उन्नितीकरीता ही योजना प्रभावीपणे राबवून दलित समाजाला न्याय मिळावा असे निवेदन दलित महासंघाच्या वतीने ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *