
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील कै. नामदेवराव जगताप उर्दु शाळेत आज शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने जुबेर जनवाडकर यांचा त्यांना उर्दु दिना निमित्त शाळेसाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल सोलापूर येथे पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते अल्लाउद्दीन शेख, अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर नालबंद, उपाध्यक्ष शुकूर शेख, मॉं आयेशा मस्जिद चे विश्वस्त साजीद बेग सामाजिक कार्यकर्ते नागेश उबाळे,आलीम खान यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

15 फेब्रुवारी उर्दू दिनानिमित्त सोलापूर येथील उर्दू घर मध्ये जिल्हा परिषद सोलापूर शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कार्यक्रमांमध्ये उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जुबेर जनवाडकर यांचा शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर कादर शेख यांच्या हस्ते विशेष पुरस्कार व सत्कार करण्यात आला होता. कै. नामदेवराव जगताप नगरपरिषद प्राथमिक उर्दू शाळा इयत्ता आठवीपर्यंत होती परंतु सरांच्या व मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या मेहनतीमुळे इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू झाले उर्दू माध्यम ची स्थानिक स्वराज्य संस्थेची ही एकमेव शाळा आहे सर्वांच्या मेहनतीमुळे आज मुलींच्या शिक्षणाला गती मिळणार आहे.

जुबेर जनवाडकर यांना विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेतील विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती यांनी त्यांचे कौतुक केले आहे.