
कमलाई नगरी
श्रीकमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपाततील असलेले मुळ मंदिरराचे दर्शन भाविक भक्तांना मिळणार आहे. श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामस गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे.

आज सोमवार दिनांक १७.०२.२०२५.रोजी धनादेश ने देणगी रु.५१,००१ /- (एक्कावन्न हजार एक रूपये फक्त) शैला नागनाथ धाराशिवकर रा. सोलापूर यांच्याकडून प्राप्त झाली आहे. यानिमित्त यांचा सत्कार मंदिर समितीचे विश्वस्त राजेंद्र वाशिंबेकर यांनी सत्कार केला. या प्रसंगी धाराशिवकर परिवार व वाशिंबेकर परिवार उपस्थित होते.

श्रीकमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती पथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.
तसेच ऑनलाईन देणगी ची सुविधा उपलब्ध आहे. संपर्क अशोक गाठे व्यवस्थापक मो नं ९४०४७०८९२४.