जेआरडी

रोपळे ग्रामस्थांनी दिलेल्या मतदानाची उतराई विकास कामांच्या रूपात करणार असून या भागातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे ठाम आश्वासन आमदार नारायण (आबा) पाटील यांनी दिले. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आयोजित आभार गाव भेट दोऱ्यात रोपळे (ता. माढा) येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर

ह.भ.प. दास महाराज, पांडुरंग मेहर, मा. सरपंच दादासाहेब भांडवलकर (वरकुटे), उपसरपंच बप्पा जाधव (चोभे पिंपरी), सरपंच भाऊराव शिनगारे (बिटरगाव), उपसरपंच काकासाहेब नाडकर (लोणी), मा. सरपंच तात्यासाहेब गोडगे (रोपळे), युवानेते आनंद गोडगे, रामचंद्र वाघमारे, अतुल दास, शरद पाटील, राजेंद्र देवकर सर, अण्णासाहेब पवार, दगडू मेहेर, गोविंद काळे, कैलास

गोडगे, संतोष पाटील, नाना दास, मेजर कुमार साळवे, वस्ताद कल्याण मेहेर, हनुमंत खताळ, शिवाजी गवळी, विष्णू फंड सर, दीपक पिसाळ, अजित गुंडगिरे, राजाभाऊ मेहेर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार नारायण (आबा) पाटील पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत परिवर्तनची लढाई जिंकताना माढा तालुक्यातील छत्तीस गावांनी महत्वाची जबाबदारी

पेलली. माढा तालुक्याच्या वेशीवर असलेल्या रोपळे गावाने दिलेली साथ मला आत्मविश्वास व बळ देणारी आहे. आगामी काळात या भागातील रस्ते, शेतीच्या पाण्याचे व विजेचे प्रश्न, आरोग्य तसेच शिक्षण व रोजगार हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण अविरत प्रयत्न करणार असून विकास निधीतून या भागात महत्वाची कामे करण्यावर भर देणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. प्रस्तविक तात्यासाहेब गोडगे यांनी केले तर आभार आनंद गोडगे यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *