करमाळा प्रतिनिधी

प्रस्तावित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या संदर्भात मंत्रालयात 3 तारखेला होणारी नियोजित बैठक आता 3 तारखेच्या ऐवजी 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होईल अशी माहिती मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी आज

पत्रकारांना बोलताना दिली. वेळेत झालेल्या बदलाबाबत माहिती देताना बागल म्हणाले की, प्रस्तावित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती मिळण्यासाठी व सदर योजनेचा सर्वे लवकरात लवकर होऊन योजना मार्गी लावण्यासाठी जलसंपदा

मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांची व लोकप्रतिनिधींची आपण दिलेल्या पत्राची दखल घेऊन दिनांक 3 फेब्रुवारी रोजी मंत्रालयामध्ये स्वतंत्र बैठक आयोजित केली होती. परंतु विखे पाटील यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे सदरची 3 तारखेची बैठक आता 4 फेब्रुवारी रोजी विखेपाटील यांच्या मंत्रालयातील दालनात सकाळी 11 वाजता संपन्न होणार असल्याची माहिती बागल यांनी यावेळी दिली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *