
करमाळा प्रतिनिधी
दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी पुणे येथे झालेल्या अरिस्टो किड्स अंतर्गत ऑफलाइन आंतराष्ट्रीय अबॅकस व वैदिक maths स्पर्धेत एकूण 23 देशासह 3000+ विद्यार्थ्यांनी विविध लेवल मधून परीक्षेमध्ये सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमासाठी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मॅनेजिंग डायरेक्टर उज्वल पांडा सरांनी केले. त्यांच्या प्रास्तविकामध्ये अबॅकस वैदिक मॅच आपल्याला भविष्यामध्ये उज्वल यश मिळवण्यासाठी याचा अत्यंत उपयोग होतो व लहान वयात विद्यार्थ्यांचा मेंदूचा विकास जास्तीत जास्त विद्यार्थी अबॅकस चे नॉलेज घेतल्यानंतर त्यांचा मेंदू कॅल्क्युलेटर पेक्षाही गतीने काम करत असताना दिसून येतो याचा उपयोग शालेय अभ्यासात प्रगती होण्यासाठी व प्रत्येक स्पर्धात्मक परीक्षेसाठी कसा होतो त्यांनी उदाहरणाद्वारे सर्वांना पटवून या कार्यक्रमासाठी विविध स्तरातून विविध राज्यातून विद्यार्थी पालकांसहित उपस्थित होते.

या स्पर्धेचा निकाल त्याच दिवशी संध्याकाळी पुणे येथे सर्व पालक व शिक्षक समवेत जाहीर झाला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना 10 मिनिटात अबॅकस साठी 75 गणिते अचूक सोडविणे अनिवार्य होते. यामधे करमाळा येथील सार्थक वनारसे इंटरनॅशनल रँक तिसरा, सार्थक संजय करंडे आंतरराष्ट्रीय रँक फोर्थ, आदित्य अभिजीत दुधे आंतरराष्ट्रीय रँक 1st, विवान दिनेश मेहेर आंतरराष्ट्रीय रँक सेकंड, पलक प्रीतम बलदोटा इंटरनॅशनल सिक्स रँक घेऊन अकॅडमी ची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. अकॅडमी या स्पर्धेसाठी 56 विद्यार्थी सहभागी झाले होते. अभिनव पब्लिक स्कूल वाशिंबे या शाळेतूनही विद्यार्थी सहभागी होते. आंतरराष्ट्रीय क्रमांकावर विविध लेव्हल्स मधून विद्यार्थ्यांनी बक्षीस मिळवले.

शरवरी रोहित शिंदे (आंतरराष्ट्रीय सातवा रँक), प्रणील अनिल वैद्य आंतरराष्ट्रीय रँक 49, सुयश दयानंद चौधरी आंतरराष्ट्रीय रँक 19, श्रावणी रामेश्वर खराडे आंतरराष्ट्रीय रँक 7, आर्यन तात्यासाहेब जाधव आंतरराष्ट्रीय बँक 18, अथर्व गहिनीनाथ बनसोडे आंतरराष्ट्रीय रँक 32, साद बागवान आंतरराष्ट्रीय 50, रिद्धी प्रशांत शिंदे आंतरराष्ट्रीय 54, प्रतीक जालिंदर सावंत 55, राजवी चिन्मय मोरे 58, आरुष बलभीम बनसोडे 18, आदेश आशिष मेहता 125, शंभुराजे प्रफुल्ल शिंदे 93, शिवतेज वर्धमान जाधव 77, ऋषिराज वीरेंद्र लष्कर 52, रिदम भूपेंद्र बोराडे 9, शरयू रघुनाथ फरतडे 11, अन्वी अमोल हिरण 50, रियांशी प्रणित कुमार जैस्वाल 45, ईश्वरी भारत मुकणे 30, साई सागर काळे 59, यश नरेश शहा 21, स्पंदन बापू घरबुडे 16, आर्यन सामराज कापसे 102, सहभागी अनुजा भोसले, सानवी राठोड.
वरील सर्व विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर करमाळ्याचे नाव लौकिक केले आहे व मुथा अबॅकस अकॅडमी ला विक्रमांचा उच्चांक मिळून दिलेला आहे.
सर्व विद्यार्थ्यांचे यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील व एडवोकेट बाबुराव हिरडे, समाजसेवक श्रेणिक खाटेर यांच्याकडून कौतुक करण्यात आले.