
करमाळा प्रतिनिधी
दिनांक १९ रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना+२ स्तर मौजे उंदरगाव ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने उंदरगावच्या ४२ भूमिपुत्रांचा सन्मान सोहळा ढोल तासे व लेझिम च्या गजरात साजरा करण्यात आला. प्रतेक भूमिपुत्रांना जांभळीचे झाड व सन्मानपत्र देऊन ऐतिहासिक सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर पाटील स्वच्छता दूत उंदरगाव हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे उंदरगावचे सुपुत्र सध्या इंडियन फॉरेस्ट सर्विस आय एफ एस (IFS) या पदावरती कार्यरत असणारे आप्पासाहेब निकत यांनी रु. ११,१११ (अकरा हजार एकशे अकारा) ग्रामपंचायत उंदरगाव स्मार्ट व्हिलेज बनवण्यासाठी आर्थिक मदत केली. तसेच महेश कोलते यांनीही रू. ५००० (पाच हजार रुपये), प्रवीण गरदडे यांनीही ५००० (पाच हजार रुपये), देविदास कांबळे रु. ५००० (पाच हजार रुपये), राजेंद्र निकत (सर) रु. ५००० (पाच हजार रुपये), प्रा. महेश निकत (सर) ग्लोबल सायन्स करमाळा रु. ५००० (पाच हजार रुपये) ग्रामपंचायतला झाडे लावण्यासाठी देण्यात आली.

गणेश जावळे रु. ५००० (पाच हजार रुपये), राजेंद्र निकत रु. ५००० (पाच हजार रुपये), चांगदेव पाटील रु. २१०० (दोन हजार शंभर रुपये), तुकाराम देवकर रु. २००० (दोन हजार रुपये), संतोष कांबळे मुलांच्या शिक्षणासाठी पुस्तकांचा संच देऊ असे घोषित केले.
कार्यक्रमाला उंदरगाव सर्व ग्रामस्थ तसेच उंदरगाव चे नूतन सरपंच युवराज मगर तसेच उपसरपंच शिवाजी कोकरे ग्रा. स. समाधान कांबळे व ग्रा. स. प्रभावती गरदडे यांनी भूमिपुत्रांचा सन्मान केला. यशवंत कुदळे (ग्रामसेवक), शंभू कनेरे (तलाठी), प्रा. सुजाता भोरे, प्रा. राहूल श्रीरामे, प्रा. संजय पाटील, प्रा. धिंदळे मनोहर, प्रा. गजेंद रोकडे व (NSS) एन एस एस स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश मगर यांनी केले व या कार्यक्रमाचे आभार सोलापूर जिल्हा समन्वयक लक्ष्मण राख (सर) यांनी मानले.