करमाळा प्रतिनिधी
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती चिंतामणी दादा जगताप यांनी बाजार समिती कर्मचाऱ्यांवर मनमानी कारभार करणे, कायदेशीर बाब असताना सुद्धा राजकीय व स्वताचे हितसंबंध जोपासण्या करीता बाजार समिती बेकायदेशीर पणे बंद ठेवणे, स्वतः राजकीय घडामोडीत हिरिरीने सहभागी होणे, कामावर हजर नसताना बोगस पगार उचलने, शेतकरी विरोधी कार्य करणे, अफरा-तफर करुन खोटे दस्त तयार करणे, संगनमत करुन संघटीत पणे बाजार समिती (शेतकरी संस्था) चे न भरुन येणारे नुकसान करणे, संस्थेची व शेतकऱ्यांची फसवणुक करुन आंदोलन करुन आदर्श सेवा नियमांचा भंग करणे इत्यादी बाबत कलम 420 (318/4),466,467,468,166 सह 34 नुसार दि. 16/3/2020 रोजी बाजार समिती कर्मचाऱ्यां विरुद्ध करमाळा फौजदारी न्यायालयात खाजगी तक्रार प्रकरण दाखल केले होते.
सदर गुन्हे दखल पात्र व अजामीनपात्र असल्याने मे.फौजदारी न्यायालय यांनी गंभीर दखल घेत सर्व आरोपी (कर्मचारी) यांचे विरुद्ध दि. 16/1/2025 रोजी इश्यू प्रोसेसचा आदेश पारीत केला असुन मे.कोर्ट यांनी आदेशात असे नमुद केले आहे की तक्रारदार यांचा अर्ज व पोलीस तपास अहवाल याचे अवलोकन केले असता प्रथमदर्शनी वरील नमुद गुन्ह्याची कलमे आरोपींवर निष्पन्न झाल्याचे निदर्शनास आल्याने सर्व आरोपीं विरुद्ध वरील नमुद गुन्ह्याचे कलमांन्वये कार्यवाही पुढे सुरु करणे कामी आदेश पारित केले आहेत. उपसभापती चिंतामणी दादा जगताप यांच्या वतीने ॲड. जयदिप देवकर हे काम पाहत आहेत.