
करमाळा प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमांतर्गत ग्रंथालय विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य वाढविण्यासाठी “सामूहिक वाचन” या उपक्रमाचे ७ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ साविंत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल बी पाटील हे होते. मराठी विभाग प्रमुख प्रा. नितीन तळपाडे यासह प्रा. डॉ. सपनाराणी रामटेके, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. प्रा. अभिमन्यू माने, प्रा.डॉ. वंदना भाग्यवंत, प्रा. चिन्मय किर्दाक, प्रा.डॉ. विनायक खरटमल, प्रा.कृष्णा कांबळे, प्रा. विष्णु शिंदे इ. प्राध्यापक उपस्थित होते.

या उपक्रमात १०१ विद्यार्थ्यानी भाग घेतला होता. बी. ए., बी. कॉम., बी. एससी., आणि अकरावी आर्ट, कॉमर्स, सायन्स अश्या सर्व विभागाच्या विद्यार्थ्यांनी यात आपली आपली उपस्थिती नोंदवली. विद्यार्थ्यांना कादंबरी, चरित्र, कविता, नाटक अशा वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके देण्यात आली होती. ती त्यांनी सामूहिक पद्धतीने वाचन केली. यातील सर्व पुस्तके विद्यार्थ्यांनी आपल्या मनाने निवडल्या होत्या.
