
करमाळा.
“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमांतर्गत यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथील ग्रंथालय विभाग तर्फे “ग्रंथ प्रदर्शनी” ३० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी समिती सदस्य आणि हिन्दी भाषा प्रमुख प्रा. डॉ. ए. एम. साळुंखे यांनी ग्रंथालय प्रदर्शनीचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. एस. एस. रामटेके यांनी केली.

या प्रसंगी प्रा. डॉ. ए. एम. साळुंखे यांनी “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमविषयी विद्यार्थ्यांना माहिती करून दिली. तसेच ग्रंथ प्रदर्शनी मध्ये ठेवण्यात आलेल्या पुस्तकांचे वाचन करून या उपक्रम अंतर्गत वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. या कार्यक्रमाचे आभार डि. जी. कबाडे यांनी केले.

हे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी दि.३०/१२/२०२४ पासून ते दि. ०६/०१/२०२५ पर्यंत खुले करण्यात आले होते. या प्रदर्शनीचा लाभ विद्यार्थ्यांनी पुढील सलग आठ दिवस घेतला.