
करमाळा प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे “वाचन संकल्प महाराष्ट्रचा” या उपक्रमा अंतर्गत ‘ग्रंथालय स्वच्छता’ हा उपक्रम ग्रंथालय विभागाची स्वच्छता करून २९ डिसेंबर रोजी राबविण्यात आला. या उपक्रमाला महाविद्यालयाचे सर्व समिती सदस्य प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, ग्रंथपाल डॉ. एस. एस. रामटेके, हिंदी भाषा प्रमुख प्रा. डॉ. ए. एम. साळुंखे, इंग्रजी भाषा प्रमुख

डॉ. ए. पी. माने, मराठी भाषा प्रमुख प्रा. एन. एल. तळपाडे, एन. एस. एस. समन्वयक प्रा. एस. डी. मुळीक तसेच ग्रंथालयीन कर्मचारी लिपिक डी. जी. कबाडे, लिपिक एस. आर. बेरे, परिचर एम.पी. कदम आणि इतर तसेच शिपाई गणेश वळेकर, अशोक फुटाणे, हनुमंत सुतार, बापू माने, इत्यादी उपस्थित होते.
ग्रंथालय कर्मचारी आणि सर्व शिपाई यांनी मिळून ग्रंथालयाची स्वच्छता केली.
