
करमाळा प्रतिनिधी
बार्शी येथील एम.आय.टी. स्कूलमध्ये राष्ट्रीय सरपंच संसदेच्या सोलापूर जिल्हा पदाधिकारी निवड व ओळखपत्र प्रदान कार्यक्रम काल दुपारी पार पडला. ‘एमआयटी, पुणे’ शिक्षणसंस्था समूहाचे कार्यकारी अध्यक्ष व ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ चे प्रणेते राहूल कराड यांच्या संकल्पनेतून ‘भारतीय छात्र संसद’, ‘राष्ट्रीय महिला परिषद’, ‘राष्ट्रीय शिक्षक काँग्रेस’ आणि ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ची स्थापना करण्यात आली आहे. देशाच्या शाश्वत व सर्वांगीण ग्रामविकास प्रक्रियेत ‘पंचायतराज’ व्यवस्थेतील लोकनियुक्त लोकप्रतिनिधींची भूमिका मध्यवर्ती व सर्वात महत्वाची आहे.

देशाच्या पंचायतराज व्यवस्थेतील सर्व लोकप्रतिनिधींचे अराजकीय स्वरूपात सूसंघटन करणे, त्यांचे सर्वांगणी प्रबोधन करणे व विविध उपक्रमांचे अभ्यासपूर्वक संयोजन करून त्यांना प्रत्यक्ष ग्रामविकास प्रक्रियेत मौलिक सहकार्य करणे हे ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’चे प्रमुख उद्दिष्ट्य आहे.

हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत ग्रामविकासाचे राष्ट्रीय स्तरावरील हे महत्वपूर्ण अभियान यशस्वीरित्या विस्तारीत करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देत असलेल्या अनेकांची ॲड. विकास जाधव (प्रांताध्यक्ष राष्ट्रीय सरपंच संसद), योगेश पाटील (प्रमुख समन्वयक राष्ट्रीय सरपंच संसद) यांच्या हस्ते यावेळी नियुक्ती करण्यात आली. यामध्ये डॉ. विद्या अमोल दुरंदे यांची ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’च्या सोलापूर जिल्हा महिला संघटक’ या पदावर तसेच कविता घोडके पाटील महिला जिल्हाध्यक्ष, रवींद्र वळेकर-तालुकाध्यक्ष करमाळा, महेश गणगे- तालुका संघटक, मनोहर कोडलिंगे-तालुका समन्वय, धनश्री गलांडे -महिला तालुकाध्यक्ष, सोनाली भोसले-महिला समन्वयक आदी नियुक्त्या देखील करण्यात आल्या. यावेळी जिल्हाभरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.