
करमाळा प्रतिनिधी
आज सावित्रीबाई फुले जयंती निमित्त श्री कमलादेवी कन्या विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था करमाळा संचालक मंडळ गणेश चिवटे, शाम पुराणिक, सुनिल सूर्यपुजारी, महेश परदेशी, प्रविण गायकवाड तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका शेलार मॅडम सिताबई भगवान परदेशी विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका भागवत मॅडम तसेच उपस्थित पालकांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

बालआनंद मेळावा याने विद्यार्थिनींमध्ये नफा तोटा, व्यवहार ज्ञान तसेच संवाद कौशल्य आदींची माहिती होऊन त्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो तसेच विद्यार्थिनींना विविध संतुलित आहार, फळे, फळभाज्या, पालेभाज्या आदींचे महत्त्व कळते. या उद्देशाने प्रशालेत दरवर्षीप्रमाणे बाल आनंद मेळावा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. यावेळी विद्यार्थिनींकडून विविध प्रकारचे फळे पालेभाज्या फळभाज्या संतुलित आहार तसेच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीस ठेवले गेले होते. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मंडळी व नागरिकांनी उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रशालेतील मुख्याध्यापिका, शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
