करमाळा प्रतिनिधी

कुगाव तालुका करमाळा येथील ग्रामपंचायतच्या नूतन उपसरपंच पदी बागल गटाच्या विजया उद्धव गावडे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. शिवसेना जिल्हा युवा नेते व मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल व महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष व राज्य सहकारी साखर संघाच्या संचालिका नेत्या रश्मीदीदी बागल

यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली कुगाव गावाच्या प्रगतीसाठी विकासासाठी आम्ही निश्चित योगदान देऊ याची ग्वाही गावडे यांनी यावेळी दिली. या निवडीचे वेळी आदिनाथ चे मा. चेअरमन धनंजयदादा डोंगरे, विद्यमान सरपंच सुवर्णाताई पोरे, उपसरपंच प्रकाश दादा डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश बोंद्रे, विजय कोकाटे, अर्जुन अवघडे, संदिपान कामटे, मन्सूर सय्यद,

नवनाथ अवघडे, कैलास बोंद्रे, माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, मार्केट कमिटीचे संचालक महादेव कामटे, माजी उपसरपंच इनुस सय्यद, पोलीस पाटील जालिंदर हराळे, सागर पोरे, सचिन गावडे, आबासाहेब डोंगरे व शहाबुद्दीन सय्यद उपस्थित होते. तसेच ग्रामसेवक श्रीकांत बारकुंड व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *