
करमाळा प्रतिनिधी
झरे, दि. 16 डिसेंबर 2024. करमाळा तालुक्यातील, झरे येथील जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलच्या वतीने अतिशय आनंदमय व उत्साही वातावरणात लीड स्टुडंट्स कॉन्फरेन्स चे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आधुनिक युगातील विविध प्रकारची मॉडेल्स, आदित्य सूर्ययान, रोबोट, महिला अंतराळवीर सुनिता विल्यम आणि आकर्षक कलाकृती सादर केली होती.

या कार्यक्रमासाठी ज्योती मुथा मॅडम व डॉ.स्वाती घाडगे मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या. मुथा मॅडम व घाडगे मॅडम यांनी आपल्या भाषणाद्वारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश बिले सर, संचालिका स्वाती बिले मॅडम, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक स्टाफ व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मोठया प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या

संचालिका, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक स्टाफ व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले.तसेच विविध उपकरणे बनविण्यासाठी पालकांनीही खूप परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री साने मॅडम यांनी केले.