करमाळा प्रतिनिधी

दि. 18 डिसेंबर 2024 रोजी केम येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जि. प. शाळा घारगाव येथील मुलांच्या मोठ्या गटाने कबड्डी स्पर्धेमध्ये अद्भुत कामगिरी करत बलाढ्या समजल्या जाणाऱ्या संघाविरुद्ध विश्वसनीय खेळी साकारत तालुक्याच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.

आजच्या विजेत्या संघाला क्रीडा शिक्षक विलास चव्हाण सर, मुख्याध्यापक खलील खान सर, क्रीडाप्रेमी युवक राज केसकर, केंद्रप्रमुख मुंढे, दादा बुधवंत सर, प्रसाद कुलकर्णी सर, रजनी पाटील मॅडम, अनिता यादागिरे तुमचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक यांचे अभिनंदन शाळा व्यवस्थापन समिती व समस्त घारगाव ग्रामस्थ यांनी केले आहे व जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *