सोलापूर: जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्या विरोधात शुक्रवारी बोंबाबोंब आंदोलन करून कार्यालयात धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी सीईओ यांच्याकडे दिले. यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी तातडीने माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना पत्र व्यवहार करून सर्व कागदपत्रांसह गुरुवारी सुनावणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळवले आहे.

       माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडे शिक्षक भारती संघटनेने निवेदनाद्वारे जिल्ह्यातील नऊ बोगस मान्यतांवर कारवाई करण्याविषयी तक्रार दिली आहे. माहिती अधिकार कायद्यानुसार मागितलेली माहिती माध्यमिक शिक्षण विभागातून जाणीवपूर्वक दिली गेलेली नाही. याबाबत राज्य माहिती आयोग यांच्याकडून आदेश झालेले असताना, तसेच जिल्हा नोडल अधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडून आदेश झालेले असताना सचिन जगताप यांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी मागितलेली माहिती मिळावी याकरिता 15 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय विरोधात उपोषण केले. यावेळी आठ दिवसात माहिती देण्याची लेखी आश्वासन देणाऱ्या सचिन जगताप यांनी अद्याप पर्यंत माहिती उपलब्ध करून दिलेली नाही. अशाप्रकारे स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून बोगस मान्यता घेणाऱ्या शाळा संस्थांना पाठीशी घालणे, माध्यमिक शिक्षण विभागाचा भ्रष्ट कारभार लपवण्यासाठी माहिती अधिकार देण्याचे टाळणे या विरोधात लोकशाही मार्गाने वारंवार विनंती निवेदन देऊन शिक्षणाधिकारी यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले नाही. शासनमान्य संघटने कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने कामकाज करणाऱ्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या विरोधात शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करून माध्यमिक शिक्षण विभागात धरणे आंदोलन करत असले बाबत तक्रारी निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी सीईओ कार्यालयास दिलेले आहे.

         निवेदनातील गंभीर बाबींची दखल घेत सीईओ ॲक्शन मोडवर आलेले आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सर्व कागदपत्रांसह गुरुवारी सीईओ यांनी त्यांच्या निजी कक्षात सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचा पत्र व्यवहार केला गेला आहे. याविषयी सचिन जगताप यांच्याकडून माहिती प्राप्त न झाल्यास तसेच बोगस मान्यता असणाऱ्या शाळांवर कारवाई न झाल्यास संघटनेना बोंबाबोंब आंदोलनावर ठाम असल्याचे सुजितकुमार काटमोरे यांच्याकडून सांगण्यात आले. यावेळी संघटनेचे देवदत्त मेटकरी, नितीन रुपनर, शरद पवार, रियाज अहमद अत्तार, शाहूराव बाबर, मायाप्पा हाके, शशिकांत पाटील, सूर्यकांत कणमुसे, राज देवकते, शरीफ चिकळ्ळी, योगेश टोणपे, सिद्धाराम तळवार हे पदाधिकारी उपस्थित होते.

“माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग सुरू केला आहे. एकाधिकारशाही व हुकूमशाही सुरू केली असून शासनमान्य संघटनांच्या निवेदनांकडे दुर्लक्ष करून कामकाज सुरू ठेवले आहे. माहिती अधिकार न मिळाल्यास व बोगस मान्यता वरील कारवाई न झाल्यास दिलेल्या निवेदनाप्रमाणे शिक्षक भारती लोकशाही मार्गाने बोंबाबोंब आंदोलन करून माध्यमिक शिक्षण विभागात धरणे धरण्यात येईल. सीईओ संदीप कोहिनकर माध्यमिक शिक्षण विभागातील गैरकारभाराला चाप लावतील याचा संघटनेला विश्वास आहे. मागण्या मान्य झाल्यास आंदोलन होणार नाही.”

विजयकुमार गुंड (जिल्हा प्रवक्ता शिक्षक भारती सोलापूर)

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *