
करमाळा प्रतिनिधी
ओबीसी नेत्यांना महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये डावल्यामुळे ओबीसी समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. देशाचे नेते ओबीसींचे छगनराव भुजबळ, आमदार गोपीचंद पडळकर, धनगर समाजाचे नेते प्रा. राम शिंदे, माजी मंत्री सुधीर भाऊ मुंगटीवार या ओबीसी नेत्यांना काही प्रस्थापित नेत्यांमुळे डावलण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र

फडणवीस यांच्यावर ओबीसी समाजाने विश्वास ठेवून भरघोस मतदान केले. महायुतीला “न भूतो न भविष्य” असे यश मिळाले ते केवळ ओबीसी समाजामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये 63% ओबीसी समाज आहे. सर्वांनी ओबीसी नेते भुजबळ यांच्यावर विश्वास ठेवून महायुतीला भरघोस असे मतदान केले परंतु ओबीसी नेत्यांना जाणून बुजून डावलले आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी जर ओबीसी नेते भुजबळ यांना कॅबिनेट मंत्री पद द्यावी व मुख्यमंत्री देवेंद्र

फडणीस यांनी बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर व प्रा. राम शिंदे यांना कॅबिनेट मंत्री करावे अशी मागणी ओबीसी नेते अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे. जर या नेत्यांना मंत्रिमंडळात न घेतल्यास होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मतदान रूपातून त्यांची जागा त्यांना दाखवण्यात येईल असा इशारा सुपनवर यांनी दिला. या बैठकीला ओबीसी समाजातील विनोद महानवर, शिवाजीराव बनकर, अनिल तेली, तुळशीराम नाळे, संतोष जाधव, दत्तात्रय भुजबळ, आजिनाथ इरकर, प्रशांत शिंदे, अण्णासाहेब शिंदे, अजित दुधे, सचिन दुधे, प्रल्हाद मेहर, भालचंद्र इवरे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.